---Advertisement---

अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी

On: रविवार, जुलै 24, 2022 12:20 AM
sam northeast 410
---Advertisement---

इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शनिवारचा (२३ जुलै) दिवस इतिहासात नोंदवला गेला. ग्लॅमॉर्गन काउंटी संघाचा फलंदाज सॅम नॉर्थईस्टने इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू मधील एका सामन्यात नाबाद ४१० धावांची अप्रतिम खेळी खेळून दिग्गजांच्या यादीत आपले नाव नोंदवले.

लीसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ग्लॅमॉर्गनने पाच बळी गमावत ७९५ धावांवर आपला डाव घोषित केला. यामध्ये ४१० धावा एकट्या नॉर्थईस्टच्या होत्या. सोबतच त्याने ग्लॅमॉर्गन संघाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या बनवण्याचा पराक्रम केला. क्रिकेटविश्वात सर्वोच्च प्रथमश्रेणी वैयक्तिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नॉर्थईस्ट नवव्या क्रमांकावर आला.

https://twitter.com/GlamCricket/status/1550904027755560961?t=o9klbqxvmY0_07pYy3TMCQ&s=19

 

नॉर्थईस्टने या ४१० धावा फक्त ४५० चेंडूत केल्या. ज्यात ४५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. संघाला सामन्याच्या शेवटच्या दिवशी निकाल मिळण्याच्या आशेने डाव घोषित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे तो वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नाबाद ५०१ धावांच्या विश्वविक्रमाला आव्हान देऊ शकला नाही. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम अजूनही लाराच्या नावे आहे.

लाराच्या यादीत समाविष्ट झाले नाव

मात्र, लाराचे नाव ज्या यादीत आहे त्या यादीत नॉर्थईस्टचे नाव समाविष्ट झाले. तब्बल १८ वर्षांनंतर प्रथमच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वैयक्तिक ४०० पेक्षा जास्त धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ३२ वर्षीय फलंदाजापूर्वी शेवटच्या वेळी २००४ मध्ये ब्रायन लाराने अँटिग्वा कसोटीत इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची नाबाद खेळी केली होती, जी आंतरराष्ट्रीय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील वर्षी हार्दिक होणार निवृत्त? 

VIDEO: ‘नंबर वन मेरा इंडिया’ आशिया कपचे स्फूर्तीदायी ऍंथम सॉंग रिलीज 

चहल भाऊ लईच नशीबवान! चाहते तर सोडाच आता पत्नीच म्हणाली, “मीच तुझी सर्वात मोठी…” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---