आयपीएल 2024 मध्ये रविवारच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.
या सामन्यासाठी आरसीबीनं आपल्या प्लेइंग 11 मध्ये एक मोठा बदल केला. गुजरातविरुद्ध स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं पुनरागमन केलं आहे. 3 सामने बाहेर बसल्यानंतर तो संघात परतला. मॅक्सवेलनं संघात परतताच आपला इम्पॅक्ट टाकला आणि लगेचच विकेट घेऊन फॉर्ममध्ये येण्याची चिन्ह दाखवली.
या सामन्यात मॅक्सवेलनं गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. गिल आज मैदानावर संघर्ष करताना दिसला. त्यानं 16 धावा काढण्यासाठी 19 चेंडू खेळले, ज्यामध्ये फक्त एका चौकाराचा समावेश होता. पुनरागमन केल्यानंतर मॅक्सवेलचं हे पहिलंच षटक होतं. त्यानं चौथ्या चेंडूवर गिलला कॅमेरुन ग्रीनच्या हाती झेलबाद केलं. विकेट घेतल्यानंतर मॅक्सवेल खूपच जोशात दिसत होता.
Watch out for that Cameron Green outfield catch! 🔥🔥@RCBTweets are pumped 🆙 as Shubman Gill departs for 16.
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/COSdH7YAVg
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
ब्रेक घेण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल शेवटचा मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात मॅक्सवेल फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला होता. तर गोलंदाजीत त्यानं एका षटकात 17 धावा दिल्या होत्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मॅक्सवेल खेळला नाही. मॅक्सवेल म्हणाला की तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी ब्रेक घेत आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी मॅक्सवेलला 6 सामन्यात केवळ 32 धावा करता आल्या होत्या. या दरम्यान त्यानं 4 विकेट घेतल्या होत्या.
ग्लेन मॅक्सवेलसाठी आयपीएलचा शेवटचा हंगाम फारच चांगला राहिला होता. आयपीएल 2023 मध्ये त्यानं 14 सामन्यांत 33.33 ची सरासरी आणि 183.49 च्या स्ट्राईक रेटनं 400 धावा ठोकल्या होत्या. या दरम्यान 77 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आरसीबीची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे कदाचित मॅक्सवेलनं फॉर्ममध्ये येण्यास उशीर केला, असंच म्हणता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारताला विश्वचषक जिंकवून देणारे गॅरी कर्स्टन बनले पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
“आता 250 धावांचा बचाव करणंही अवघड”, रिषभ पंतनंही केले ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित