आयपीएलमध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 45 चेंडूत 70 धावा केल्या.
पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने रोहित शर्माचा अतिशय अवघड वाटणारा झेल घेतला. रोहितने लॉन्ग ऑफवर हवेत मारलेला चेंडू मॅक्सवेलने सीमारेषेवर झेलला. झेल घेतल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेपलीकडे जाईल असे त्याला वाटले, त्यामुळे त्याने चेंडू समोर उभा असलेला खेळाडू जेम्स नीशमकडे चेंडू फेकला व नीशमनेही तो झेल सहजपणे पकडला.
याआधीही आयपीएल 2018 मध्ये त्याने असाच झेल घेतला होता तेव्हा त्याच्यासोबत न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा खेळाडू होता. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने घेतलेला झेल:
What a thriller catch by Maxwell pic.twitter.com/jgzvrf3h4k
— Yashwant Kewat (@YashwantKewat5) October 1, 2020
आयपीएल 2018 मध्ये मॅक्सवेलने घेतलेला झेल:
https://www.instagram.com/p/BjAITBfHiSe/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
त्याने घेतलेल्या या झेलमुळे एका चाहत्याने ट्विटरवर त्याचे कौतुक केले आहे.
Maxwell must be holding the world record for most relayed catches! Does it so often.#KXIPvsMI
— Omkar Mankame (@Oam_16) October 1, 2020
मॅक्सवेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२.३ च्या सरासरीने १४२७ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत २६ झेल घेतले आहेत.