आयपीएल 2021 मध्ये रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरू संघातून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना आकर्षित केले आहे. मागील हंगामात एकही षटकार न मारू शकलेला मॅक्सवेल यंदाच्या हंगामात षटकारांची आतिशबाजी करताना दिसत आहे. परंतु त्याच्या संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने एक मजेदार व्हिडीओ शेअर करत मॅक्सवेलवर सोपा झेल डाईव्ह मारून अवघड दाखवत असल्याचा मजेदार असा आरोप लावला आहे.
आपणास माहिती आहे की, मॅक्सवेल हा एक उत्तम क्षेत्ररक्षक असून राजस्थान विरूद्धच्या सामन्यात त्याने शिवम दुबेचा जबरदस्त असा झेल पकडला होता. याच सामन्यात चहलनेसुद्धा दोन झेल पकडले होते. परंतु मॅक्सवेलच्या डाईव्ह मारण्याच्या शैलीला चहल सहमत नसल्याचे चहलने सांगितले.
या व्हिडीओमध्ये मॅक्सवेलने चहल आणि तो सोबत सराव करत असल्याचे त्याने सांगितले. तर चहलने संघातील प्रत्येक खेळाडूला तसेच सहकारी स्टाफला मॅक्सवेल बक्षीस मिळवण्यासाठी कशाप्रकारे जाणीवपुर्वक डाईव्ह मारून झेल पकडतो, हे सांगितले. तसेच संघातील शाहबाज अहमदनेही चहलच्या या गोष्टीला साथ दिली. याबरोबरच चहलने संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि एबी डीविलियर्स यांच्याकडे यागोष्टीबाबत तक्रार केली असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1385798148963065859?s=20
आयपीएल 2021चे सत्र आरसीबी संघासाठी खूप चांगले राहिले आहे. आरसीबीने यंदाच्या मोसमात चारपैकी चारही सामने जिंकले असल्याने गुणतालिकेत हा संघ एक नंबरवर आहे. तर संघातील फिरकीपटू चहलने चारही सामने खेळले असून त्यामध्ये त्याने फक्त दोन बळी मिळवले आहेत. आयपीएल इतिहासात चहलने एकूण 103 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 123 बळी आपल्या नावे केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाच सामन्यात दोन अर्धशतके; मॅक्सवेलच्या कामगिरीबद्दल दिग्गज म्हणाला, “त्याच्या यशाने अचंबित झालोय”
आईच्या हातचा घास, बहिणीची प्रेमळ मिठी अन् बाबांची शिकवण; कुटुंबीयांच्या आठवणीत सुंदर झाला भावुक
नाणेफेकीचा कौल सीएसकेच्या पारड्यात, धोनी आणि विराटच्या संघात झाले ‘हे’ प्रमुख बदल






