---Advertisement---

बाबो! तब्बल १०७९ दिवसांनी मॅक्सवेलने मारला आयपीएलमध्ये षटकार, तोही चक्क १०० मीटरचा, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 1:01 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर १६० धावांचे आव्हान पूर्ण करत सामना २ विकेट्सने जिंकला. बेंगलोरकडून पहिल्याच सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा आक्रमक अंदाज दिसला. त्याने मारलेल्या षटकारांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी चांगली गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फलंदाजीला केवळ १५९ धावांवर रोखले. त्यानंतर  १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा डाव सांभाळला.

मॅक्सवेलने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केली होती. यात त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले होते. त्याने कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर डावाच्या ११ व्या षटकात पहिला षटकार १०० मीटरचा लगावला होता. तर राहुल चहरच्या चेंडूवर त्याने स्वीच हिट करत दुसरा षटकार लगावला होता. या षटकारांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे तब्बल १०७९ दिवसांनी मॅक्सवेलने  आयपीएलमध्ये षटकार मारला. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये २०१८ च्या हंगामात २६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शेवटचा षटकार मारला होता.

https://twitter.com/TeluguRcb/status/1380583348771282946

मॅक्सवेलला मागील हंगामात पंजाब किंग्सकडून खेळतानाही एकाही सामन्यात षटकार मारता आला नव्हता. त्याच्यासाठी मागील हंगाम अत्यंत खराब गेला होता. त्यामुळे पंजाबने त्याला यंदाच्या लिलावाआधी मुक्त केले होते. त्यानंतर बेंगलोरने त्याच्यावर १४ कोटींपेक्षाही अधिक रकमेची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले. मॅक्सवेल या हंगमातील पहिल्याच सामन्यात मात्र, प्रभाव पाडला आहे.

बेंगलोरने मिळवला विजय 

या सामन्यात मुंबईने बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले होते. बेंगलोरने १६० धावांचे हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! झेल घेण्याच्या प्रयत्नात विराटच्या डोळ्याखाली जोराने आदळला चेंडू; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण

सूर्यकुमारने लगावला गगनचुंबी षटकार, मग ६ फूट ८ इंच उंचीच्या जेमीसनने ‘असा’ घेतला बदला, व्हिडिओ व्हायरल

भारीच ना! वॉशिंग्टनने टिपला जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या लिनचा ‘सुंदर’ झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---