---Advertisement---

सूर्यकुमारने लगावला गगनचुंबी षटकार, मग ६ फूट ८ इंच उंचीच्या जेमीसनने ‘असा’ घेतला बदला, व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 12:25 AM
---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामाला आजपासून (१ एप्रिल) सुरुवात झाली आहे. आयपीएलची पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही बलाढ्य संघामध्ये पार पडली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून,मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. यावेळी या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्स संघासाठी आक्रमक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. या खेळीनंतर त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहिल्या डावात मुंबई संघाने फलंदाजी करताना २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध टी२० मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने या सामन्यात देखील ताबडतोड फलंदाजी करत २३ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

त्याने हा एकमेव षटकार डावाच्या ११ व्या षटकात ६ फुट ८ इंच उंची असलेल्या काइल जेमिसनच्या चेंडूवर लगावला होता. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

तसेच हा षटकार मारल्यानंतर लगेचच त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेमीसनने सूर्यकुमारला बाद केले. सूर्यकुमार ऑफसाईड ऑफला फटका मारायला चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटला घासून यष्टीरक्षक एबी डिविलियर्सच्या हाती गेला. त्याच्या या विकेटचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Ani18sin/status/1380535699074506761

या सामन्यात मुंबईने बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले होते. बेंगलोरने १६० धावांचे हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

भारीच ना! वॉशिंग्टनने टिपला जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या लिनचा ‘सुंदर’ झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

MI v RCB: पहिल्या सामन्यात मुंबईच्या पराभवाचा इतिहास कायम, बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी

Video : नेहमी शांत दिसणाऱ्या द्रविडला भर रस्त्यात आला राग; म्हणाला, ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे!’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---