इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. आज (९ एप्रिल )या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या बलाढ्य संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. तसेच याच सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली गंभीर दुखापती होता होता वाचली.
या मोठ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या या डावातील १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला असता.
तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी काईल जेमीसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डाव्या हाताचा फलंदाज कृणाल पंड्याने मिड ऑफच्या वरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. तो चेंडू सरळ विराट कोहलीच्या हातात गेला होता. परंतु झेल सुटला आणि चेंडू विराटच्या डोळ्याला जाऊन लागला. हा चेंडू लागल्यानंतर त्याच्या डोळ्या जवळ जखम झाल्याचे पाहायला मिळत होते.
Ball hit under of Virat Kohli's eyes. And hope all well, and he is fine. But still he is on the field, he's dedication level is Unbelievable. pic.twitter.com/avcegZSkE5
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 9, 2021
असे असतानाही विराट नंतर सलामीला फलंदाजीला उतरलेला दिसला. विशेष म्हणजे त्याने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलबरोबर ५२ धावांची भागीदारीही रचली.
Eye of the tiger#IPL2021 #MIvRCBpic.twitter.com/P3DIUistnl
— Himanshu (@himanshux_) April 9, 2021
#RCB or anti #RCB as a cricket fan you will breathe a sigh seeing that ball hit the cheek and not the eye of #ViratKohli.
Hope he is alright..❤️#MIvRCB #MI #RCB #PlayBold pic.twitter.com/ZXj48XufMB— Mohammed Sohail ❁ (@ItsSohailM) April 9, 2021
बेंगलोरने जिंकला सामना
मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने १९ तर ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. यासोबतच ईशान किशनने २८ धावा केल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने १६० धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत हा सामना जिंकला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना! वॉशिंग्टनने टिपला जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या लिनचा ‘सुंदर’ झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
MI v RCB: पहिल्या सामन्यात मुंबईच्या पराभवाचा इतिहास कायम, बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी