क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. आज अनेक देशांच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श आहे. एवढेच नाही तर अनेक आई-वडील क्रिकेटमध्ये जर त्यांच्या मुलाला रस असेल, तर त्याला सचिन तेंडुलकरसारखा हो, असे सांगतात. वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेल्या सचिनने तब्बल २४ वर्षे क्रिकेट जगतावर अक्षरश: वर्चस्व गाजवले. अशा क्रिकेटपटूची भेट होणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ग्लेन मॅक्सवेलने सचिनला भेटण्यासाठी मुलाखत अर्ध्यात सोडल्याची दिसत आहे.
झाले असे की २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या विश्वचषकासाठी सचिन ब्रँड अँबेसिडर होता. त्यामुळे तो अंतिम सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर उपस्थित होता. अंतिम सामना दोन यजमान देशांत म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झाला. हा सामना मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला.
त्यामुळे सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आनंद साजरा करत होता. या दरम्यान काही खेळाडू मुलाखत देण्यात व्यस्त होते. यात अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलही होता. या अंतिम सामन्यानंतरच्या सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर स्टेजच्या दिशेने जात होता. तेव्हा त्याला मुलाखत देत असलेल्या मॅक्सवेलने पाहिले. त्यानंतर तो लगेचच ती मुलाखत सोडून सचिनच्या दिशेने धावला आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर तो पुन्हा मुलाखत देण्यासाठी गेला. या क्षणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
This is the impact he has in this beautiful game. Maxwell hugs Sachin leaving his interview and it's in Australia.#HappyBirthdaySachin pic.twitter.com/vXaO52XXAM
— Souvik Maity (@souvik7maity) April 24, 2020
मॅक्सवेल गेले ९ वर्षे ऑस्ट्रेलियाकडून खेळत आहे. त्याने सचिनविरुद्ध २ आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत. मॅक्सवेलने आत्तापर्यंत ७ कसोटी सामने खेळले असून ३३९ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची कसोटी कारकिर्द जरी जास्त बहरली नसली तरी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याने कमाल केली आहे.
Glen Maxwell Hugs Sachin Tendulkar
The #GooseBumps Movement For All @Sachinist
RT 🔃🔃 Feeling Same @sachin_rt 🙏🙏@Gmaxi_32 Love Form 🇮🇳 pic.twitter.com/ztHT9VjTNN
— TAPAS MAKUR (@SRT_for_ever) February 24, 2017
मॅक्सवेलने ११६ वनडेत २ शतके आणि २२ अर्धशतकांसह ३२३० धावा केल्या आहेत आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत. तसचे ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३ शतके आणि ९ अर्धशतकांसह १७८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ३१ विकेट्स घेतल्या आहेत. २०१५ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मॅक्सवेलला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण गोलंदाजी करताना त्याने मार्टिन गप्टिलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. तसेच टीम साऊथीला धावबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकची टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी निवड, पण यष्टीरक्षक नव्हे तर ‘या’ भूमिकेत
ना रोहित ना विराट ना पुजारा, भारताच्या ‘या’ स्फोटक फलंदाजाला घाबरला बलाढ्य न्यूझीलंड संघ