इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २६ वा सामना अष्टपैलू क्रिकेटपटू हरप्रीत ब्रार याने गाजवला. पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवारी (३० एप्रिल) अहमदाबाद येथे झालेला हा सामना पंजाबने ३४ धावांनी खिशात घातला. फलंदाजी आणि गोलंदाजीत मोलाचे योगदान देत २५ वर्षीय हरप्रीतने संघाला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला. दरम्यान हरप्रीत आणि बेंगलोरचा धाकड फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्यात मजेशीर प्रसंग घडल्याचे पाहायले मिळाले.
त्याचे झाले असे की, पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या. पंजाबच्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आमि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु ११ व्या षटकापर्यंत पंजाबच्या गोलंदाजांनी त्यांना पव्हेलियनला धाडले.
अकराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराटची दांडी उडवल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला होता. दमदार फॉर्ममध्ये असलेला मॅक्सवेल सलामी जोडीची विकेट गेल्यानंतर संघाचा डाव सावरेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु षटकातील दुसऱ्या आणि मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर हरप्रीतने त्याची दांडी उडवली.
हे पाहून, काही क्षण आपण गोल्डन डक झाले आहोत याच्यावर मॅक्सवेलला विश्वासच बसला नाही. तो काही वेळ हरप्रीतकडे एकटक पाहत उभा राहिला. त्यानंतर त्याने पंचांकडेही पाहिले आणि शेवटी नॉन स्ट्राईकवर असलेल्या रजत पाटीदारला विचारपूस केली. अखेर आपण मैदानावर थांबण्यात किंवा डीआरएस घेण्यात कसलाही अर्थ नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो मैदानाबाहेर पडला.
https://twitter.com/lodulalit001/status/1388173666228207620?s=20
या गमतीशीर प्रसंगाने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये २ अर्धशतके झळकावत २०० पार धावा करणाऱ्या मॅक्सवेलला पंजाबकडून यंदाचा पहिलाच सामना खेळत असलेल्या खेळाडूने बाद केल्याचे पाहून आरसीबीचे चाहचेही थक्क झाले असावेत.
कोहली, मॅक्सवेल यांच्यानंतर याच हरप्रीतने मिस्टर ३६० लाही तंबूत धाडले. बाराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार केएल राहुलच्या हाती झेल देत एडी डिविलियर्स बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत: ९१ धावांची धमाकेदार खेळी करुनही राहुलने ‘या’ खेळाडूंना म्हटले मॅच विनर
मोठ्या मनाचा माणूस! ज्या गोलंदाजांने केले क्लीन बोल्ड, त्यालाच सामन्यानंतर भेटायला गेला विराट कोहली