सध्या ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघ पाच टी२० सामन्यांची मालिका खेळत आहेत. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (३ मार्च) पार पडला. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात मात्र शानदार पुनरागमन करत विजय मिळवला.
या विजयात स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे महत्वपूर्ण योगदान होते. मॅक्सवेलने या सामन्यात ३१ चेंडूत ७० धावांची वादळी खेळी उभारली. या खेळीत त्याने मारलेल्या एका षटकाराची विशेष चर्चा झाली. त्याच्या ताकदवान षटकाराने स्टेडियममधील रिकाम्या खुर्चीला मोठे छिद्र पडले. आता याबाबत त्याने केलेल्या एका कृतीची चांगलीच चर्चा होते आहे.
समाजकार्यासाठी केली मदत
मॅक्सवेलच्या षटकाराने स्टेडियममधील खुर्चीला मोठे छिद्र पडले होते. सामन्यानंतर सोशल मिडीयावर या गोष्टीची चानागलीच चर्चा रंगत होती. हीच संधी साधून स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन हार्मोन यांनी ट्विटरवर ग्लेन मॅक्सवेलला एक आवाहन केले होते. यात मॅक्सवेलने तुटलेल्या खुर्चीवर आपली सही द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती.
मॅक्सवेलच्या सहीनंतर या खुर्चीचा लिलाव केल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच या लिलावातून मिळालेली रक्कम स्थानिक गरजू महिलांना मदत म्हणून दिले जाईल, हे देखील सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मॅक्सवेलने या खुर्चीवर सही केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याची माहिती दिली.
Destructive on the field and in the stands.@Gmaxi_32 certainly left a lasting impression on Wellington tonight! 😂 #NZvAUS pic.twitter.com/ZNA36gGAgP
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
दरम्यान, मॅक्सवेलने या खेळीने टीकाकारांना जोरदार प्रत्युतर दिले. तसेच पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाला पुनरागमन देखील करुन दिले. मॅक्सवेल आणि इतर खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या जोरावर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी विजय मिळवला. मालिकेतील पुढचा म्हणजेच चौथा सामना येत्या ५ मार्चला खेळावला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित
धोनीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तोबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत