ग्लेन मॅक्सवेल नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघात परतला. मात्र, पुन्हा एकदा तो दुखापतीचा बळी ठरला होता. डर्बनमध्ये संघाच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रादरम्यान मॅक्सवेलला डाव्या घोट्याला दुखापत झाली. त्याची दुखापत किरकोळ असल्याचे सांगितले जात असले तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याला रिकव्हरीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान त्याचे एक वक्तव्य समोर आले आहे.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला भारत दौऱ्यावर फक्त काही सामने खेळायचे आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोशी संभाषण करताना तो म्हणाला की, मला अजूनही भारताच्या मालिकेत काही सामने खेळायचे आहेत. माझ्यावर कोणतेही दडपण नसले तरी. निवडकर्ते आणि सपोर्ट स्टाफचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. ते माझ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण आणू इच्छित नाहीत कारण त्यांना माहित आहे की, विश्वचषकाला काही दिवसांवर आहे. त्यामुळे घाई करण्याऐवजी मी स्वत:ला थोडा वेळ देऊ इच्छितो, जेणेकरून मी संपूर्ण विश्वचषकासाठी तंदुरुस्त राहू शकेन.
विश्वचषक 2023 यावर्षी भारतात होणार आहे. भारताने विश्वचषकाचे पद भूषवले आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. मॅक्सवेलला संपूर्ण विश्वचषक खेळायला आवडेल. असे त्याचे मत आहे.
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोंबरला आमने सामने असतील. यानंतर भारात-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोंबरला रंगणार आहे. यासाठी दोन्ही संगांकडून मोठ्या प्रमात तयारी चालू दिसत आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकासाठी आपली जर्सी देखिल प्रदर्शित केली आहे. सध्या चालू असलेल्या आशिया चषकातील भारतीय संघााचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
आशिया चषकातील सुपर 4 मध्ये पाकिस्तान संघाने प्रवेश केला आहे. आता भारतीय संघला सोमवारचा नेपाळविरुद्ध सामना जिंकावा लागेल. असे झाले तरच भारतीय संघ आशिया चषकातील सुपर 4 मध्ये पोहचेल. (glenn maxwell talk about his injury)
महतवाच्या बातम्या-
पंतच्या फिटनेसबाबत चांगली अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाने शेअर केला नवा व्हिडिओ
शेवटी मान्य केलेच! शाहीन आफ्रिदीचे मोठे वक्तव्य, म्हणाला, ‘विराट दिग्गज…’