आयपीएल २०२० च्या हंगामात किंग्स इलेवेन पंजाब संघाकडून खेळलेला ऑस्ट्रेलियन संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाब संघाने लिलावाआधी मुक्त केलेल्या मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १४.२५ करोड रुपयांची बोली लावत खरेदी केले आहे. ग्लेन मॅक्सवेल आपल्या विस्फोटक फलंदाजीमुळे बेंगलोर संघाला धावांचा डोंगर उभारण्यास मदत करू शकतो. त्याला संघात सामील केल्यानंतर त्याने बेंगलोरसाठी खास ट्विटही केले आहे.
मॅक्सवेलने बेंगलोर संघाकडून खेळण्याची व्यक्त केली होती इच्छा
आयपीएल लिलावाच्या ठीक एक दिवसाअगोदर ग्लेन मॅक्सवेलने बेंगलोर संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि विशेष म्हणजे गुरुवारी(१८ फेब्रुवारी) झालेल्या लिलावात त्याला बेंगलोर संघाने आपल्या गोटात समाविष्ट करण्यात आले आहे. मागच्या हंगामात पंजाब संघाकडून खेळताना मॅक्सवेलला साजेशी कामगिरी करता आली नाही. यामुळेच पंजाब संघाने त्याला मुक्त केले होते. येत्या आयपीएल सत्रात मॅक्सवेलकडून बेंगलोर संघाला भरपूर अपेक्षा असणार आहेत.
ट्विट करत मानले आभार
संघात समाविष्ट केल्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेल याने ट्विट करत आभार मानले आहे. तो म्हणाला, “मी यावर्षी बेंगलोर संघासाठी खेळण्यासाठी उत्सुक आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी माझ्याकडे जे आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.”
https://twitter.com/Gmaxi_32/status/1362356826659037184
ग्लेन मॅक्सवेलची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी
ग्लेन मॅक्सवेल हा गेल्या हंगामात पंजाब संघाकडून खेळत होता. परंतु, त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या ३०१ सामन्यात २७.२ च्या सरासरीने आणि १५२ च्या स्ट्राईक रेटने एकूण ६५८१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टॉप-५ : आयपीएल लिलावाचे बादशहा, युवराजला पछाडत ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात महागडा
‘जाय रिचर्डसन’ ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा गोलंदाज; पंजाब किंग्सकडून १४ कोटींची विक्रमी बोली
अपने तो अपने होते है ! ‘हे’ दोन विदेशी गोलंदाज पुन्हा मुंबईच्या ताफ्यात