इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मेपासून १२ व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाबद्दल अनेक दिग्गजांनी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. तसेच अनेकांनी या विश्वचषक विजेतेपदासाठी यजमान इंग्लंड प्रबळ दावेदार असल्याचे मत मांडले आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचाही समावेश झाला आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मॅकग्रा म्हणाले, ‘इंग्लंड वनडे संघ म्हणून खूप चांगला आहे. माझ्यासाठी ते या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार आहेत. मला वाटते ते चांगले खेळतील. तूम्ही त्यांच्या वर्तमानातील फॉर्मला नजरअंदाज करु शकत नाही. इंग्लंडचा संघ सध्या जसा खेळत आहे त्यामुळे मी प्रभावित झालो आहे.’
‘त्यांनी मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत. काही संघ पहिल्या १५ षटकात तर काही शेवटच्या १५ षटकात आक्रमक खेळ करतात आणि मधल्या षटकांमध्ये डाव सांभाळतात. पण इंग्लंड आणि भारत असे संघ आहेत जे संपूर्ण ५० षटके एकात लयीत खेळतात. हाच टी२० क्रिकेटचा प्रभाव आहे.’
‘मी असे म्हटले नाही की ते विश्वचषक जिंकतीलच पण ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांना त्यांच्या घरच्या परिस्थितीत पराभूत करणे कठिण आहे. पण आशा आहे की ऑस्ट्रेलिया चांगले खेळेल.’
‘मला इंग्लंड आणि भारत मजबूत संघ वाटतात. पण ऑस्ट्रेलियाही चांगला खेळ करेल अशी आशा आहे. दक्षिण आफ्रिकाही चांगला संघ आहे. वेस्ट इंडिज डार्क हॉर्स आहेत. ते कदाचित पाकिस्तानप्रमाणे खूप चांगले खेळू शकतात किंवा खूप वाईट खेळू शकतात. त्यामुळे हा खूप रोमांचकारी विश्वचषक होणार आहे.’
‘इंग्लंड आणि भारताला पराभूत करणे कठिण आहे. पण ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्मपाहून ते अंतिम सामन्यात प्रवेश करतील असे वाटते.’
तसेच ऑस्ट्रेलियाच्या २००७ च्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचललेल्या मॅकग्रा यांनी ऑस्ट्रेलियाबद्दल म्हटले आहे की ‘मी ऑस्ट्रेलिया या विश्वचषकात कशी खेळणार या बाबत थोडा चिंतीत आहे. पण त्यांच्या वर्तमानातील फॉर्मने मला प्रभावित केले आहे. त्यांनी त्यांना अनुकुल नसणाऱ्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी संधी वाढल्या आहेत.’
‘मला ते अंतिम सामन्यात प्रवेश करतील असा विचार करायला आवडेल. भारतही चांगला वनडे संघ आहे. ते सुद्धा या शर्यतीत आहेत.’
या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ३० मे ला पार पडणार आहे. या विश्वचषकात सर्व सहभागी १० संघ साखळी फेरीत एकमेकांशी सामना खेळणार आहेत. तसेच नंतर अव्वल चार संघ उपांत्य सामने खेळतील. १४ जूलैला या विश्वचषकातील अंतिम सामना पार पडेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीच्या टिकाकारांना ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल
–विश्वचषक पुरुषांचा पण याबाबतीत महिलांनी घेतली आघाडी…
–विश्वचषकाआधी भुवनेश्वर कुमारचा चाहत्यांना खास संदेश, पहा व्हिडिओ






