भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना बरोबरीने सुटला. पावसामुळे हा सामना निकाली निघाला नाही, पण भारताने मालिका मात्र 1-0 अशा फरकाने नावावर केली. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय बरोबर देखील ठरत होता, पण तितक्यात पावसाने बाधा आणली आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. न्यूझीलंडचा मध्यक्रमातील फलंदाज ग्लेन फिलिप्स याने सामन्यात एक असा षटकार मारला, ज्याची चर्चा सध्या होत आहे.
भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांमध्ये 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 75 धावा करून सुरुवातीच्या चार महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या होत्या. सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड वाटत असतानाच पावस आल्यामुळे सामना बरोबरीवर सोडवला गेला. पंचांनी डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून हा निर्णय घेतला. ग्लेन फिलिप्स सलामीवीर डिव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) यांनी अर्धशतके केली. यादरम्यान फिलिप्सने मारलेला एक षटकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडच्या डावातील 13 वे षटक युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) घेऊन आला. षटकातील शेवटच्या चेंडूवर फिलिप्सने पूर्ण ताकतीन एक षटकार मारला, जो स्टेडियमच्या झताला जाऊन लागला. फिलिप्सने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा शॉट खेळला जो थेट छतापर्यंत पोहोचला. चहलच्या षटकातील हा षटकार एवढा अप्रतिम होता की, भारती फलंदाज देखील त्याकडे पाहतच राहिले. चाहत्यांकडून सोशल मीडियावर या षटकाराचे कौतुक होत आहे.
a SIX so good by Phillips, you have to watch it on 🔄! 😅
For more outstanding action from the 3rd #NZvIND T20I, LIVE & EXCLUSIVE on Prime Video: https://t.co/Alcf9enTYg#NZvINDonPrime #CricketOnPrime pic.twitter.com/i7APII4RyY
— prime video IN (@PrimeVideoIN) November 22, 2022
25 वर्षांच्या ग्लेन फिलिप्सने नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात देखील सर्वांना प्रभावित केले होते. त्याने विश्वचषकातील एका सामन्यात शतक देखील केले होते. त्याच्या एकंदरीत टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने न्यूझीलंडसाठी एकूण 56 टी-20 सामने खेळले आहेत. यामद्ये त्याच्या नावावर एकूण 1360 धावांची नोंद आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दबाव नेहमीच असतो, पण मी मैदानावर कुठलेही…’, प्लेअर ऑफ द मॅच सूर्याची प्रतिक्रिया
सॅमसन आणि उमरानला संधी न देण्यावर हार्दिक म्हणतोय, “हा माझा संघ आहे”