टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आतापर्यंत अनेक लक्षणीय दृश्य पाहायला मिळाले आहेत. जसे की, खेळाडूंचे क्षेत्ररक्षण, फलंदाजांचे गगनचुंबी षटकार, गोलंदाजांची घातक गोलंदाजी. यातील क्षेत्ररक्षणाचे असेच काहीसे शानदार दृश्य न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यात पाहायला मिळाले. सुपर 12 फेरीतील या पहिला सामन्यात न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स याने शानदार झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेल हा पाहण्यासारखा होता. यादरम्यानचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
झाले असे की, या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 200 धावा चोपल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाला 201 धावांचे भलेमोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. नियमित अंतराने त्यांच्या झटपट विकेट्स पडल्या. संघाच्या 34 धावांवर 3 विकेट्स पडल्या. यानंतर मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्यालाही कमाल दाखवता आली नाही.
ग्लेन फिलिप्सचा झेल
न्यूझीलंडकडून नववे षटक मिचेल सँटनर (Mitchell Santner) टाकत होता. यावेळी त्याच्या दुसऱ्या चेंडूवर स्टाईकवर असलेल्या स्टॉयनिसने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने चित्त्याच्या चपळाईने झेप घेत हवेतच हा झेल घेतला. समालोचकही फिलिप्सच्या या कामगिरीला सुपरमॅन झेल म्हणाले. स्टॉयनिस बाद झाला, तेव्हा तो 14 चेंडूत 7 धावांवर खेळत होता. फिलिप्सच्या झेलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
Superhuman Phillips!
We can reveal that this catch from Glenn Phillips is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from Australia v New Zealand.
Grab your pack from https://t.co/8TpUHbQQaa to own iconic moments from every game. pic.twitter.com/VCDkdqmW3m
— ICC (@ICC) October 22, 2022
Superrrrrr Catch @ICC @ICCMediaComms @BLACKCAPS #ausVsnewzealand @glennphillips pic.twitter.com/EuTwEWxIJn
— Lala_g_Gaurav™ (@LalaGgaurav1) October 22, 2022
Glenn Phillips 💥
Will someone beat this to claim the best catch of this tournament? I doubt not!#GlennPhillips | #AUSvNZ | #T20WC2022 pic.twitter.com/WYwte0F0g0
— Kasi Viswanathan (@kc_wiz) October 22, 2022
https://twitter.com/SadiqShaiksk41/status/1583757130628497408
What a catch by Glenn Phillips https://t.co/kNIYC1kRNh
— Spartan (@_spartan_45) October 22, 2022
मार्कस स्टॉयनिस गोलंदाजीतही फ्लॉप
यापूर्वी मार्कस स्टॉयिनस ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करतानाही फ्लॉप ठरला. त्याला एकही विकेट घेता आली नाही. स्टॉयनिसने एकूण 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा दिल्या. यामध्ये त्याने 1 चेंडू वाईड टाकला, तर त्याच्या गोलंदाजीवर 1 चौकार आणि 2 षटकारही मारण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!