बुधवारी (दि. 14 जून) आगामी ग्लोबल टी20 कॅनडा 2023 लीगसाठी खेळाडूंची यादी जाहीर झाली. या यादीत आजी- माजी दिग्गजांचा भरणा आहे. त्यात आंद्रे रसेल, ख्रिस गेल, हरभजन सिंग, शाहिद आफ्रिदी आणि शाकिब अल हसन यांचा समावेश आहे. ही स्पर्धा 20 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान ब्रॅम्प्टन ओंटारियोमध्ये खेळली जाणार आहे. यामध्ये 18 दिवसांत 25 सामन्यांचे आयोजन होणार आहे. हे 25 सामने 6 फ्रँचायझींमध्ये रंगणार आहेत.
विन्निपेग हॉक्स आणि एडमोंटन रॉयल्स या दोन फ्रँचायझी स्पर्धेच्या 2019 हंगामात होत्या, पण या हंगामात त्यांचा समावेश नाहीये. त्यांची जागा सरे जग्वार आणि मिसिसॉगा पँथर्स या फ्रँचायझींनी घेतली आहे. प्रत्येक संघात पूर्ण आणि आयसीसी सहयोगी देशाचे 16 खेळाडू सामील आहेत. यामध्ये 6 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, ज्यात दोन मार्की स्टार, सहयोगी देशाचे 4 खेळाडू आणि 6 कॅनडाचे क्रिकेटपटू सामील आहेत.
शाकिब अल हसन, आंद्रे रसेल (Andre Russell) आणि ख्रिस लिन हे खेळाडू मॉन्ट्रियल टायगर्स संघाकडून खेळतील. हरभजन सिंग (Harbhajan Singh) या हंगामात न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम याच्यासोबत ब्रॅम्प्टन वॉल्व्ज संघात दिसेल. टोरंटो नॅशनल्स संघात न्यूझीलंडचा विश्वासू खेळाडू कॉलिन मुन्रो याच्यासोबत शाहिद आफ्रिदी सामील होईल, तर मिसिसॉगा पँथर्स संघात ख्रिस गेल (Chris Gayle) आणि शोएब मलिक यांचाही समावेश असेल.
The Universe Boss – Chris Gayle is here to light up the six with the Mississauga Panthers ????
Get ready to witness one last round with the greatest of the modern game!
#GameOn #GT20Canada #GT20Season3 #GT20CanadaDraft pic.twitter.com/YtpmioK3tD
— GT20 Canada (@GT20Canada) June 13, 2023
सरे संघाकडे पाकिस्तानचा अव्वल फलंदाज इफ्तिखार अहमद याच्यासोबत सलामीवीर ऍलेक्स हेल्सही असेल. तसेच, वँक्युअर नाईट्स संघाने पाकिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज रस्सी व्हॅन डर ड्यूसेन यांना या हंगामासाठी आपल्या मार्की खेळाडूंच्या रूपात संघात घेतले आहे.
ग्लोबर टी20 2023साठी संघ
ब्रॅम्प्टन वॉल्व्ज-
हरभजन सिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साउदी, मार्क सिंक्लेयर चॅपमॅन, उस्मा मीर, हुसैन तलत, उस्मान खान, लोगन वैन बीक, जान निकोलास फ्राइलिनक, मॅक्स ओ डॉव्ड, जेरेमी गॉर्डन, आरोन जॉनसन, रिजवान चीमा, शाहिद अहमदजई, ऋषिव जोशी, गुरपाल सिंह संधू.
मॉन्ट्रियल टायगर्स-
आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, ख्रिस लिन, शेर्फेन रुदरफोर्ड, कार्लोस ब्रेथवेट, मुहम्मद अब्बास आफ्रिदी, जहीर खान, मुहम्मद वसीम, आकिफ राजा, अयान खान, दीपेंद्र ऐरी, कलीम सना, श्रीमंथा विजेरत्ने, मॅथ्यू स्पोर्स, बुपेंद्र सिंग, दिलप्रीत सिंग, अनूप चीमा.
मिसिसॉगा पैंथर्स-
शोएब मलिक, ख्रिस गेल, आजम खान, जेम्स नीशम, कॅमरन स्कॉट डेलपोर्ट, शाहनवाज दहनी, जहूर खान, टॉम कूपर, सेसिल परवेज, जसकरनदीप सिंग बुट्टर, नवनीत धालीवाल, निखिल दत्ता, श्रेयस मोव्वा, प्रवीण कुमार, मिहिर पटेल, एथन गिब्सन.
सरे जग्वार-
ऍलेक्स हेल्स, इफ्तिखार अहमद, जेसन बेहरेनडॉर्फ, लिटन कुमार दास, करीम जनत, मोहम्मद हॅरिस, संदीप लामिछाने, अयान खान, जतिंदर सिंग, बर्नार्ड शोल्ट्ज, परगट सिंग, दिलन हेलिगर, अम्मार खालिद, सनी मथारू, शील पटेल, कैरव शर्मा.
टोरंटो नॅशनल्स-
कॉलिन मुन्रो, शाहिद आफ्रिदी, फजलहक फारूकी, जमान खान, सईम अयूब, अब्दुल्ला शफीक, हमजा तारिक, गेरहार्ड इरास्मस, जोहान्स जोनाथन स्मिथ, फरहान मलिक, साद बिन जफर, निकोलस किर्टन, अरमान कपूर, सरमद अनवर, रोमेल शहजाद, उदय भगवान.
वैंकूवर नाईट्स
मोहम्मद रिझवान, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, नवीन उल हक, रीजा राफेल हेंड्रिक्स, कॉर्बिन बॉश, नजीबुल्लाह जादरान, जुनैद सिद्दीकी, वृति अरविंद, कार्तिक मयप्पन, रुबेन ट्रम्पमैन, रविंदरपाल सिंग, हर्ष ठाकर, रेयान पठान, नवाब सिंग, मुहम्मद कमल आणि कंवर तथागुर. (global t20 canada andre russell chris gayle harbhajan singh and shahid afridi among marquee names drafted)
महत्वाच्या बातम्या-
Ashes 2023 : कधी, कुठे आणि कशी पाहता येईल इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी मॅच? वाचा लगेच
मोईनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देताच संतापला इंग्लंडचाच माजी कर्णधार; म्हणाला, ‘मी स्टोक्स नाही…’