आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन संघ एकमेकांशी भिडले. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी जबरदस्त फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. मॅक्सवेलने या सामन्यात ८ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी केली. यासह आयपीएलमध्ये त्याच्या २००० धावाही पूर्ण केल्या.
मॅक्सेवलसाठी आयपीएल २०२१ चा पूर्ण हंगाम चांगला राहिला आहे आणि त्याने संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही त्याने नाबाद अर्धशतकी खेळी पूर्ण केली आणि आयपीएलच्या चालू हंगामतील दुसरा सर्वाधिक वेळा अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच या सामन्यात त्याने आयपीएलमधील आपल्या २००० धावा पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो १६ वा विदेशी खेळाडू ठरला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक करणारे खेळाडू
१ . केएल राहुल – ६ वेळा अर्धशतक
२. ग्लेन मॅक्सवेल – ६ वेळा अर्धशतक
३. फाफ डू प्लेसिस – ५ वेळा अर्धशतक
दरम्यान, सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या मोहम्मद सिराजने संघासाठी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर २० षटकांमध्ये १६४ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या श्रीकर भरत आणि ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी महत्वाची खेळी केली आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. श्रीकर भरतने ५२ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर विजयी षटकर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला. भरतला मॅन ऑफ द मॅचही निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये १४ वर्षात कोणाला न जमलेली कामगिरी मोहम्मद नबीच्या नावावर
वॉर्नरने घेतला हैदराबादच्या चाहत्यांचा निरोप, लिहिला भावूक संदेश