---Advertisement---

हॉकी इंडियाला मिळाला ईशान्य भारतातील पहिलाच अध्यक्ष; ‘या’ व्यक्तीची झाली बिनविरोध निवड

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 4:06 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | हॉकी प्रशासकीय मंडळाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) नवी दिल्लीत 10 वी हॉकी इंडिया कॉंग्रेस आजोजित केली आणि निवडणुकाही घेतल्या. माजी अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडले गेल्यानंतर हॉकी इंडिया कार्यकारी मंडळामध्ये परतले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारला.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे सदस्यांच्या युनिट्ससाठी बैठकीत प्रवेश उपलब्ध करुन देण्यात आला होता. काही सदस्य संबंधित राज्य सरकारने लादलेल्या कोविड -19 प्रतिबंधांमुळे प्रवास करू शकले नाहीत.

मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निंगोम्बम यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवड झाल्यावर, हॉकी इंडियाचे नेतृत्व करणारे ईशान्य भागातील निंगोम्बम हे पहिले अध्यक्ष झाले. यावर्षी जुलै महिन्यात मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आधी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. दोन वर्षांच्या मुदतीसाठी निवडून गेलेल्या निंगोम्बम यांनी 2009-2014 दरम्यान मणिपूर हॉकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आणि ते एका दशकासाठी मणिपूर हॉकीशी जुळले आहेत.

ईशान्येकडील तळागाळात हॉकीच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून नव्या भूमिकेत या खेळाचा विकास करण्यास ते वचनबद्ध आहेत.

ज्येष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद कित्येक दशकांचा अनुभव असलेल्या क्रीडा प्रशासनात एक अनुभवी अधिकारी आहेत. त्याच्या नेतृत्वात, हॉकी इंडियाने 2018 मधील एफआयएच पुरुष विश्वचषक यासह अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या आहे. पायाभूत सुविधा आणि अंमलबजावणीसाठी त्यांचे कौतुक केले गेले. यापूर्वी ते हॉकी इंडियाबरोबर वेगवेगळ्या पदांवर सामील होते आणि नुकतेच जुलै 2020 पर्यंत अध्यक्षपदावर होते.

महत्त्वाच्या बातम्या –

ईशान्य भारतातील ‘या’ छोट्या राज्याने पटकावला सर्वोत्कृष्ट हॉकी इंडिया सदस्य विभागाचा खिताब

एशियन हॉकी फेडेरेशन घेणार निशुल्क शैक्षणिक कार्यशाळा, ‘या’ अधिकाऱ्यांना मिळणार लाभ

“भारतीय पुरुष व महिला हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल”, भारतीय क्रीडामंत्र्यांची प्रतिक्रिया

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---