गुरुवारी(५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२० च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात ५७ धावांनी पराभूत केले. तसेच सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्सवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण मुंबई इंडियन्सच्या विजयाबरोबरच त्यांच्या डगआऊटमध्ये असलेल्या देवांच्या फोटोफ्रेमचीही चर्चा होत आहे.
या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये एका टेबलवर देवी लक्ष्मी आणि गणपती यांच्या फोटोफ्रेम दिसून आल्या आहेत. या फोटोफ्रमच्या बाजूला २ लॅपटॉप आणि १ सॅनिटायझरची बॉटल आहे. मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधील या टेबलचे फोटो आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स अनेकदा ट्विट करताना देखील गणपती बाप्पाचा त्यात उल्लेख करतानाही दिसतात.
Mumbai Indians dugout 🙏 pic.twitter.com/0vcwEBbMNw
— GK Nair (I Worship Shakti) (@Appugnair) November 6, 2020
मुंबई इंडियन्सने गाजवले दिल्लीवर वर्चस्व
गुरुवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० षटकात २०० धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईकडून सुर्यकुमार यादव(५१) आणि इशान किशन(५५*) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर क्विंटन डी कॉक(४०) आणि हार्दिक पंड्यानेही(३७*) वेगवान खेळ करत चांगली कामगिरी बजावली.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ८ बाद १४३ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून मार्कस स्टॉयनिसने ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. मात्र, आधीच्या फलंजांनी लवकर विकेट गमावल्या असल्याने दिल्लीला शेवटी विजय मिळवणे कठिण गेले. विशेष म्हणजे दिल्लीचे पहिले ३ फलंदाज शून्य धावसंख्येवर बाद झाले होते.
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
करावं ते तेवढं कौतूक कमीच! आयपीएलमध्ये कुणालाही न जमलेला विक्रम सूर्यकुमारच्या नावावर
फायनलपूर्वी मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले, दोन वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेला खेळाडू दुखापतग्रस्त
आयपीएल २०२० : ११ वर्षांनंतर ‘तो’ लाजीरवाणा विक्रम दिल्लीच्या नावावर