क्रीडा स्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धां टोकियो येथे सुरू आहेत. टोकियो ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियमवर रविवारी (१ ऑगस्ट) एक ऐतिहासिक घटना घडली. पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील सुवर्णपदक हे संयुक्तरीत्या अव्वलस्थानी राहिलेल्या खेळाडूंच्या संमतीने वाटून देण्यात आले. आधुनिक ऑलिम्पिकमध्ये १९१२ नंतर अशी घटना प्रथमच घडली आहे.
अशी घडली घटना
पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचा गियानमार्को तांबेरी आणि कतारचा मुताझ एस्ला बार्शिम या दोघांनी प्रत्येकी २.३७ मीटर उंच उडी मारताना अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर दोघांनीही सुवर्ण पदकासाठी २.३९ मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले. पंचांनी त्यांना आणखी एक जंप-ऑफ (प्रत्येकी एक संधी) मारण्याची आणखी एक संधी देऊ केली.
दोन्ही खेळाडूंनी घेतला ऐतिहासिक निर्णय
पंचांनी जंप-ऑफचा पर्याय सुचविल्यानंतर तांबेरी व बार्शिम यांनी पंचांना दोन सुवर्णपदके मिळू शकतात का? अशी विचारणा केली. त्याला पंच व सामधिकाऱ्यांनी होकार दर्शविल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. या घटनेबाबत बोलताना बार्शिम म्हणाला, “जंप-ऑफचा पर्याय विचारल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आम्ही विचार केला हे करण्याची काही गरज नाही व दोन सुवर्णपदकांची मागणी केली. आम्ही दोघे चांगले मित्र असून एकत्रितरित्या सराव करत असतो. आमचे स्वप्न पूर्ण झाले. ही खरी खिलाडूवृत्ती आहे व आम्ही सर्वांना एक संदेश दिला आहे.”
Wow…! The extraordinary, emotional moment Qatar’s Mutaz Essa Barshim and Italy’s Gianmarco Tamberi agree to share the high jump gold medal #Tokyo2020 #OlympicGames pic.twitter.com/8EsYRWxosf
— Shayne Currie (@ShayneCurrieNZH) August 1, 2021
Mutaz Essa Barshim praticamente adottato da Gianmarco Tamberi come Matteo Berrettini è stato adottato dalla nazionale italiana durante il giro con il pullman per tutta Roma #Tokyo2020 #GiochiOlimpici #Athletics #ItaliaTeam pic.twitter.com/j4iy9Z4IDc
— 𝑨𝒏𝒏𝒂𝒍𝒊𝒔𝒂♫ (@Tapiano77) August 2, 2021
या खेळाडूला मिळाले कांस्यपदक
तांबेरी व बार्शिम यांना सुवर्णपदक दिले गेल्यानंतर बेलारूसच्या नेलासेकाऊ याला कांस्य पदक देण्यात आले. दक्षिण कोरियाचा सेंग हायेक चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा ब्रेंडन स्टार्क पाचव्या क्रमांकावर राहिला. ब्रेंडन ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचा भाऊ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर होतोय कौतुकाचा वर्षाव, लोक म्हणाले, ‘हे खरेखुरे कबीर खान’
स्टार्कचा भाऊ ऑलिंपिकच्या फायनलमध्ये, ऑसी क्रिकेटपटूंनी सराव सोडून बांगलादेशमधून केले चीअर
Video: टीम इंडियाच्या सरावाच्या नानाविध तऱ्हा, रोहितच्या अनोख्या कल्पनेने खेळाडूही झाले लोटपोट