रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे फॉउंडेशन संचालित हिंद केसरी रोहित पटेल रेसलिंग सेंटर हे भव्य दिव्य असे महाराष्ट्रातील कुस्ती संकुल लवकरच सुरु होत आहे. या रेसलिंग सेंटरच वैशिष्ट्य म्हणजे येथे मल्लांना शिक्षण आणि कुस्ती अशा दोंन्ही गोष्टी करता येणार आहे.
या रेसलिंग सेंटरमध्ये भव्य असा हॉल, सरावासाठी २ मॅट, एक मातीचा आखाडा, तब्बल १५० मल्लांना राहण्याची सोय, शिक्षण घेत असलेल्या मल्लांना शिक्षणासाठी शाळा, कॉलेजला पोहचवायची सोय, वेगळे स्नानगृह, बेड आणि कपाट तसेच मोठा अनुभव असलेले प्रशिक्षक अशी आहेत.
देशातील हे एकमेव असं रेसलिंग सेंटर असणार आहे जिथे हिंद केसरी, रुस्तम-ए-हिंद आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी प्रथमच खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे.
त्यात हिंद केसरी रोहित पटेल, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा समावेश आहे. या स्पोर्ट्स सेंटरची यापुढे असंख्य रेसलिंग सेंटर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात अमोल भाऊ सुरु करणार आहेत.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे गुरु असणाऱ्या अमोल बुचडे स्पोर्ट्स फॉउंडेशनचे हे रोहित पटेल रेसलिंग सेंटर आहे. याबद्दल बोलताना विजय चौधरी म्हणाले, ” माझे गुरु अमोल भाऊ यांनी महाराष्ट्रातील मल्लविद्या पुढे जावी म्हणून घेतलेल्या अफाट कष्टांना आज हिंदकेसरी रोहित पटेल रेसलिंग सेंटरच्या रूपाने एक चांगले स्वरूप आले आहे. माझ्यासारख्या मल्लाला घडवताना ते माझ्या यशावरच थांबले नाहीत. त्यांनी माझ्यासारखे अनेक विजय तयार होण्यासाठी हा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे माझ्यासारखे किंवा त्याहून सरस मल्ल या रेसलिंग सेंटरमधून भविष्यात उदयाला येतील. म्हणूनच माझ्या या दोनही गुरूंचा मला अभिमान आहे. ”
https://www.facebook.com/WrestlerVijayChaudhary/posts/1405266256223661
या रेसलिंग सेंटरला भेट देण्यासाठी
पुणे-मुंबई महामार्ग, वाकड- भूमकर चौक, शनी मंदिर, अक्षरा अँड इंदिरा इंटरनॅशनल स्कूल रोड, शिवार वस्ती, मारुंजी या पत्त्यावर भेट देऊ शकता किंवा ०२० ६५४१००१४ या क्रमांकावर संपर्क करू शकता.