---Advertisement---

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 10:13 AM
---Advertisement---

श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासोबतच इंग्लंडने कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, हा सामना क्रिकेट सोबतच स्लेजिंगमुळे देखील संपूर्ण क्रिकेटविश्वात प्रसिद्ध झाला आहे.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 381 धावा केल्या व इंग्लंडचा पहिला डाव 344 धावांवर रोखला. श्रीलंकेने सामन्यात 37 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, आपल्या दुसऱ्या डावात श्रीलंकेचा पूर्ण संघ केवळ 126 धावांवरच आटोपला. त्यामुळे केवळ 164 धावांचे आव्हान सहज पूर्ण करत इंग्लंडने 6 गडी राखत सामना व मलिका आपल्या नावे केली. दरम्यान, या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी स्लेजिंग केलेले दिसून आले.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 39 वे षटक सुरू असताना डॉम सिब्ली फलंदाजी करत होता. यावेळी श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशेन डीकवेल्लाने सिब्लीची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. डीकवेल्ला सिब्लीला म्हणाला, “तू भारत दौर्‍यात सलामी करणार आहेस का.” यावर सिब्लीने शांततेत उत्तर दिले, “माहित नाही. माझ्यासाठी ही मालिका तितकीशी चांगली ठरली नाही.” दरम्यान हा सर्व मजेशीर प्रसंग सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

https://twitter.com/CowCorner9/status/1353674742515998720

दरम्यान सामन्याचा विचार केला असता सिब्लीने दुसऱ्या डावात शानदार 56 धावांची खेळी केली. मात्र, इंग्लंड साठी खरा स्टार ठरला तो कर्णधार जो रूट. रूटने आपल्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतकीय खेळी केली. रूटच्या या खेळीमुळेच इंग्लंडला श्रीलंकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळ पोहोचण्यात यश मिळाले. रुटने 309 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 186 धावांची शानदार खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेसाठी या सामन्यात लसिथ एम्बुलडेनिया एक नवा स्टार बनून पुढे आला आहे. एम्बुलडेनियाने संपूर्ण सामन्यात तब्बल 10 बळी मिळवले.

श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. इंग्लंड संघ या दौर्‍यात वनडे व टी 20 मालिके सोबतच 4 सामन्यांची बहुप्रतीक्षित कसोटी मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी चेन्नईतून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---