---Advertisement---

सलग २ पराभवानंतर हैदराबाद संघासाठी आनंदाची बातमी, ‘तो’ दिग्गज खेळाडू मैदानात परतण्यास होतोय सज्ज

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 2:27 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ सुरु होऊन आता आठवड्याचा कालावधी उलटला असून हा आठवडा अनेक संघांसाठी संमिश्र राहिला. तर सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी मात्र निराशाजनक ठरला. त्यांना त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत विजयाच्या जवळ येऊनही पराभव स्विकारावा लागला. पण असे असले तरी त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण करणाही आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे केन विलियम्सन दुखापतीतून सावरत असून लवकरच मैदानात पुनरागमन करण्यात सज्ज आहे.

विलियम्सनला डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. याच दुखापतीमुळे त्याला मायदेशात मागील महिन्यात झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या वनजे मालिकेलाही मुकावे लागले होते. तसेच तो हैदराबादच्या पहिल्या दोन सामन्यातही खेळू शकला नव्हता. पण आता तो आठवड्याभरात तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

सनरायझर्स हैद्राबाद संघाने केन विलियम्सनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तो सांगत आहे की “तुम्हाला माहित आहे की माझे लक्ष लवकरात लवकर वेदनामुक्त होण्यावर आहे आणि मी योग्य दिशेने जात आहे. आशा आहे की एका आठवड्यात मी तंदुरुस्त होईल. मी सराव आणि रिहॅबिलिटेशन दरम्यान संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रगती चांगली होत असल्याने मला आशा आहे की मी लवकरच पूर्ण तंदुरुस्त होईल.”

सध्या हैदराबादला मधल्या फळीतील फलंदाजी कमजोर पडत असल्याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षा असेल की विलियम्सन लवकरच पुनरागमन करुन ही समस्या सोडवेल.

https://twitter.com/SunRisers/status/1382995991066865672

विलियम्सनची आयपीएल आकडेवारी अप्रतिम आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५३ सामने खेळले आहेत. यामध्ये, १५ अर्धशतकांच्या मदतीने त्याने १६१९ धावा फटकावल्या आहेत. २०१८ आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅप मिळवली होती. तसेच गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० हंगामात विलियम्सनने चांगली कामगिरी केली होती. त्याने ११ डावांमध्ये ३१७ धावा केल्या होत्या. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

हैदराबादला पत्करावा लागला पराभव
बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हैदराबादला ६ धावांनी पराभूत केले. आरसीबीने दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने जवळजवळ सामना जिंकला होता, परंतु शेवटच्या षटकात हर्षल पटेलच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे संघ २० षटकांत केवळ १४३ धावा करू शकला आणि सामना गमावला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. राशिद खानने विजयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तो बाद झाल्याने हैदराबादचा आशा संपुष्टात आल्या.

तसेच त्यापूर्वी हैदराबादला आयपीएलच्या १४ व्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केवळ १० धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: डू प्लेसिस बाद मग पुन्हा नाबाद; चक्क तिसऱ्या पंचांनाच बदलावा लागला स्वत:चा निर्णय, असं नक्की झालं काय?

सौरव गांगुली व जय शहा आणखी काही काळ पाहणार बीसीसीआयचा कारभार, हे आहे कारण

“टायगर पतौडी यांच्या खराब कामगिरीसाठी मला जबाबदार धरले”, शर्मिला टागोर यांनी व्यक्त केली खंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---