भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेट जिवंत ठेवणारा ‘सुपस्टार’ आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी महान कर्णधार ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे.
विराटची या वर्षात चांगली कामगिरी झाली आहे. तसेच त्याने नुकतेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावाही पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर त्याने यावर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. या वर्षी हा टप्पा पार करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
विराटच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याला ग्रॅमी स्मिथही अपवाद ठरला नाही. त्यानेही जगमोहन डालमिया यांच्या वार्षिक कॉन्क्लेवमध्ये बोलताना विराटचे कौतुक केले आहे.
स्मिथ म्हणाला, “जागतिक क्रिकेटमध्ये सुपरस्टार्सची कमी आहे. कदाचीत इंग्लंडमध्ये एक किंवा दोन आहेत. मला वाटते विराट हा असा सुपरस्टार खेळाडू आहे.”
‘सत्य असे आहे की त्याला कसोटी क्रिकेट आवडते आणि तो त्याच्या खेळातून दाखवतो. यामुळे आयपीएल आणि टी20 क्रिकेट आवडणाऱ्या देशात कसोटी क्रिकेटही जिंवत ठेवता येते.’
‘जेवढे विराट कसोटी क्रिकेटचा एक सुपरस्टार आणि आयकॉन म्हणून प्रसार करत राहिल, तोपर्यंत आपल्याला हा खेळ जिंवत ठेवण्याची संधी आहे.
याबरोबरच स्मिथने कुकाबुरा चेडू कसोटी क्रिकेटमधी रोमांच संपवत असल्याचेही मत मांडले आहे. तो म्हणाला, ‘कुकाबुरा चेंडू निराशा करत आहे. हा चेंडू नंतर मऊ होतो आणि अधिक काळ तो स्विंग होऊ शतक नाही. त्यामुळे मला वाटते की कसोटी क्रिकेट आता कंटाळवाण्या अनिर्णित सामन्यांना सहन करु शकत नाही.’
‘कसोटी क्रिकेटमध्ये अशा चेंडूची आवश्यकता आहे, जो स्पिन होइल, स्विंग होइल आणि हवेमध्ये दिशा बदलेल. बॅट आणि चेंडूमध्ये होणारी स्पर्धाच कसोटी क्रिकेट टिकवून ठेवेल.’
तसेच स्मिथने कसोटी क्रिकेट हे खेळाडूची क्षमता, शैली आणि शारिरिक ताकद तपासत असते, असे म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला या महिन्यात करणार असलेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याची संधी असल्याचेही मत स्मिथने व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर स्मिथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचेही कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बापरे! १९ वर्षीय गोलंदाजाने घेतल्या एकाच डावात १० विकेट
–क्रिकेटच्या मैदानावर तो असतो खेळाडू, मैदानाबाहेर असतो पत्रकार
–धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला