मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खूप कमी सामने खेळले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालीच धोनीने 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गांगुली कर्णधार होता तेव्हा राहुल द्रविड यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडत होता. त्यामुळे धोनीला खेळण्याची संधी कमी मिळाली. गांगुलीला 2006 साली कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर राहुल द्रविडकडे ही जबाबदारी आली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याच्या मते, गांगुलीच्या नेतृत्वाखाली धोनी सारखा स्फोटक फलंदाज खेळला असला असता तर भारतीय संघ अधिक खतरनाक होऊन खेळला असता.
ग्रीम स्मिथ स्टार स्पोर्टसच्या ‘क्रिकेट कॅनेक्टड’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ” सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली धोनीसारखा खेळाडू राहिला असता तर भारतीय संघ अनेक मालिका जिंकला असता.”
सौरव गांगुलीने 2000-2005 दरम्यान भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली यष्टीरक्षक म्हणून अजय रात्रा, विजय दाहिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड आणि पार्थिव पटेल यांना संधी मिळाली होती.
सध्या भारतात गांगुली आणि धोनी यांच्यापैकी सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने देखील आपले मत मांडले आहे.
तो म्हणाला, “एक खेळाडू म्हणून मला असे वाटते की, गांगुली आणि धोनी यांच्या नेतृत्वामध्ये धोनीचे अंतर आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना धोनी सामना शेवटपर्यंत घेऊन जातो आणि सहज सामना जिंकून देतो.”