अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेचा हा तेरावा विश्वचषक असेल. भारतातील दहा शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेसाठी आता उद्घाटन सोहळ्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री तसेच गायक सहभागी होतील.
विश्वचषकातील पहिला सामना मागील विश्वचषकाचे विजेते इंग्लंड व उपविजेते न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे. हा वनडे सामना असल्याने स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एक दिवस आधीच करण्याचा आयसीसी व बीसीसीआयने निर्णय घेतला. एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 4 ऑक्टोबर रोजी हा उद्घाटन सोहळा रंगेल.
या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले असतील. याव्यतिरिक्त शंकर महादेवन, श्रेया घोषाल व अरिजीत सिंग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायक आपली कला सादर करतील. बॉलीवूड कलाकारांचा विचार केल्यास अभिनेता रणवीर सिंग, वरून धवन व तमन्ना भाटिया हे देखील परफॉर्मन्स करताना दिसू शकतात. याव्यतिरिक्त काही इतरही कलाकार या सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
या विश्वचषकात भारतीय संघ यजमान म्हणून सहभागी होईल. स्पर्धेत एकूण दहा संघांचा सहभाग असून, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना देखील येथे खेळला जाईल.
(Grand Opening Ceremony Of 2023 ODI World Cup Asha Bhosale Shankar Mahadevan Ranvir Singh Will Perform)
हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून






