---Advertisement---

टीम इंडिया तयारीत राहा; कसोटी मालिकेसाठी दिग्गजाने इंग्लंड संघाला दिलाय ‘हा’ गुरु मंत्र 

On: रविवार, जानेवारी 24, 2021 4:08 PM
---Advertisement---

नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतीय संघ मायदेशात परतला आहे. यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंडविरुद्ध मायभूमीत होणाऱ्या मालिकांचे वेध लागले आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडचे दिग्गज ग्रीम स्वान यांनी इंग्लंड कसोटी संघाला गुरूमंत्र दिला आहे.

इंग्लंडचे माजी फिरकीपटू स्वान यांची इच्छा आहे की, इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारताविरुद्धच्या येत्या कसोटी मालिकेत हिम्मतीने पाऊले उचलायला हवीत. भारतीय फलंदाजांविरुद्ध महत्त्वपुर्ण भूमिका बजावण्यासाठी त्यांनी फिरकीपटू जॅक लीच याची निवड केली आहे. हुसैन एन्डच्या क्रिकेट शोमध्ये बोलताना स्वान म्हणाले की, “एक गोष्ट जी मी माझ्या मनाला म्हटल्यानंतर ती वास्तवात होत असे. ती म्हणजे, सामन्यादरम्यान स्पिन चेंडू टाकणे. अगदी खेळपट्टी सपाट असेल तरीही माझा चेंडू होत असायचा.”

विराट कोहलीचा सहज सामना करता येईल- ग्रीम स्वान

“जर इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी केली, तर तुम्ही खूप सहजपणे सामने जिंकू शकता. कारण वर्तमान भारतीय कसोटी संघात विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज नाही. कर्णधार विराट कोहली तर स्पिन गोलंदाजीविरुद्ध खेळताना खराब चेंडूची वाट पाहात असतो. त्यामुळे अधिकाधिक चांगले स्पिन चेंडू टाकले तर तुमच्या अडचणी कमी होतील. भारतीय खेळाडू खूप धैर्यवान आहेत. म्हणून तुम्ही खचून न जाता हिम्मतीने खेळावे लागणार आहे. जर तुम्ही टिकून पूर्ण दिवस गोलंदाजी केली तर तुम्ही नक्कीच विकेट मिळवू शकाल”, असे स्वान पुढे बोलताना म्हणाले.

जॅक लीचला करावी लागणार ही कामे

जॅक लीचविषयी बोलताना स्वान म्हणाले की, “माझ्यासाठी लीच असा फिरकीपटू आहे, ज्याला भारताच्या मैदानांवर गोलंदाजी करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. परंतु जर त्याने सरळ गोलंदाजी केली. तसेच मधल्या यष्टीला केंद्रित करून गोलंदाजी करावी लागणार आहे. जर लीचने या गोष्टी योग्यपणे केल्या. सोबतच एका दिवसात जवळपास ४० षटके टाकली; तर तुम्हाला मार्क वुड, जेम्स अडंरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजांना अधूनमधून वापरता येईल”, असे शेवटी स्वान यांनी सांगितले.

श्रीलंकाविरुद्ध केली विशेष कामगिरी

जॅक लीच हा श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाचा भाग आहे. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लीचने अप्रतिम गोलंदाजी केली होती. या सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून त्याने एकूण ६ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान दुसऱ्या डावात त्याने फाइव्ह विकेट हॉल केला होता. त्याच्या या कामगिरीमुळे इंग्लंडने ७ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

लवकरच सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. पहिले दोन सामने ५ आणि १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार असून उर्वरित सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडकडून ७४५ खेळाडू खेळले पण ‘असा’ विक्रम करणारा जो रुट दुसराच क्रिकेटपटू

गॅले कसोटीत जो रूटचा दे घुमाके! अवघ्या १३९ चेंडूत शतक करत नोंदवला मोठा विक्रम

अँडरसनची कमाल! आशिया खंडात ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---