श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (२४ जानेवारी) तिसरा दिवस चालू असून इंग्लंड संघाने दुसऱ्या सत्राखेर ५ बाद २३८ धावा केल्या आहेत. इंग्लंडला अजून श्रीलंकाच्या पहिल्या डावातील १४३ धावांचे आव्हान गाठायचे आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने झुंजार शतक करत मोठा विक्रम नोंदवला आहे.
श्रीलंकाच्या ३८२ धावांच्या डोगंराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खास झाली नाही. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राउले आणि डोमिनिक स्बिले अवघ्या ५ धावांवर पव्हेलियनला परतले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोदेखील लवकरच बाद झाला. परंतु कर्णधार जो रूटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाचा डाव सावरला.
जो रूटने आक्रमक रवैय्या अंगीकारत २१६ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने नाबाद १३४ धावांची खेळी केली आहे. अवघ्या १३९ चेंडूंमध्येच त्याचे शतक पूर्ण झाले होते. हे रूटचे श्रीलंकाच्या मैदानावर केलेले तब्बल तिसरे कसोटी शतक आहे. यासह श्रीलंकाच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या परदेशी फलंदाजांच्या यादीत जो रूटने संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे.
जो रूटसह भारतीय दिग्गज अझहर अली, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. सोबतच ब्रायन लारा, मोहम्मद अश्रफुल आणि यूनिस खान यांनीही श्रीलंकामध्ये ३ कसोटी शतके केली आहेत. विशेष म्हणजे, मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने श्रीलंकाच्या मैदानावर श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक ५ कसोटी शतके केली आहेत. यासह या शानदार विक्रमाच्या यादीत तो अव्वलस्थानी विराजमान आहे.
इंग्लंडकडून सर्वाधिक शतके करणारा अकरावा फलंदाज
याबरोबरच श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटने केलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १९वे शतक आहे. यासह जो रूट हा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा अकरावा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडचे दिग्गज ऍलिस्टर कूक हे ३३ कसोटी शतकासह या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
कसोटीत सर्वाधिक शतके करणारे इंग्लंडचे फलंदाज
३३ शतके- ऍलिस्टर कूक
२३ शतके- केविन पीटरसन
२२ शतके- वॅली हमन्ड, कोलि काउड्रे, आयन बेल, गॉफ बॉयकॉट
२१ शतके- अँड्र्यू स्ट्राउज
२० शतके- ग्राहम गूच, केन बॅरिंग्टन
१९ शतके- लेन हटन, जो रूट
महत्त्वाच्या बातम्या-
मुलगा झाला तर त्याचं नाव रोशन ठेव, आजींचा एमएस धोनीला सल्ला; पाहा व्हिडिओ
वॉशिंग्टन सुंदरने वडिलांकडे सोपवली ‘टेस्ट कॅप’, सोशल मीडियावर होतंय कौतुक
सिडनीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह एकत्र लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, आर अश्विनचा खळबळजनक खुलासा






