काही दिवसांपूर्वी २३ जुलै पासून टोकियो ऑलिम्पिकची सुरूवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अनेक खेळ खेळले जात आहेत. हॉकीपासून ते फुटबॉल, शूटिंग ते कुस्तीपर्यंत असे सर्व खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसून येत आहेत. पण जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये प्रसिद्ध असलेला क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकचा भाग नाही. भारत देशातही अशीच चर्चा सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे की, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा देखील समावेश व्हायला पाहिजे. पण अनेकांना एक गोष्ट माहित नाही की ऑलिम्पिकमध्ये एकदा क्रिकेट खेळवण्यात आले होते.
ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १२१ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट हा खेळ पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेस खेळवण्यात आला होता. ऑलिम्पिक १९०० मध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात फक्त एकच क्रिकेट सामना खेळला गेला होता. हा सामना २ दिवसांचा होता. या सामन्यात दोन्ही संघात मिळून २४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रत्येकी संघातील १२ खेळाडू मैदानात उतरले होते. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक देखील जिंकले होते.
या सामन्यात ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी केली आणि कर्णधार बीचक्रॉफ्ट हा सलामीवीर म्हणून मैदानात उतरला होताा. त्याने या सामन्यात २३ धावांचे योगदान दिले होते. फ्रेडरिक कमिंगने सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ग्रेट ब्रिटनने ११७ धावा केल्या. फ्रान्सकडून अँडरसनने ४ बळी घेतले होते. तर या सामन्यात फ्रान्सचा पहिला डाव फक्त ७८ धावांत संपुष्टात आला. यामध्ये जे ब्रॅडने सर्वाधिक २५ धावा केल्या होत्या, तर ख्रिश्चनने ग्रेट ब्रिटन संघाकडून ७ बळी घेतले होते.
पहिल्या डावात ग्रेट ब्रिटन संघाने ३९ धावांनी आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या डावात ब्रिटनने फलंदाजी करत १४५ धावा केल्या. पहिल्या डावातील ३९ आणि १४५ धावा मिळून फ्रान्सला एकूण १८५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. ब्रिटन संघाचा कर्णधार बीचक्रॉफ्टने ५४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर अल्फ्रेड बोव्हरमनने ५९ धावा केल्या होत्या. फ्रान्स संघाला ग्रेट ब्रिटनने दिलेले लक्ष्य साध्य करता आले नाही. अवघ्या २६ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता. ब्रिटनकडून मॉन्टागु टोलरने ७ बळी घेतले होते. या सामन्यात पराभूत झाल्याने फ्रान्सला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. ( Great Britain and France contested the only cricket match in the history of the Olympics in 1900.)
#DidYouKnow France are the reigning silver medalists in Olympic cricket? 🥈
Great Britain beat France in the final of the 1900 event held in Paris, the only Games in which cricket was competed. pic.twitter.com/55kCN5J9rk
— ICC (@ICC) March 25, 2020
यानंतर पुन्हा कधीच क्रिकेट हा खेळ ऑलम्पिकमध्ये खेळण्यात आला नाही. सध्या आयसीसी क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच अनेक दिग्गजांचेही मत आहे की क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात यावा.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या बॅटनेच केला भारताचा घात! श्रीलंकेच्या फलंदाजाने ‘तो’ खणखणीत षटकार खेचत वळवला सामना