टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर दोन टी20 मालिका खेळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांंविरुद्ध प्रत्येकी तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना तिरुअनंतपुरममध्ये 28 सप्टेंबरला खेळला जाणरा आहे. कार्यावट्टम येथिल ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच केरळ प्रशासकिय विभागाने मोठा धक्का दिला आहे. केरळच्या इलेक्ट्रिसिटी बोर्ड लिमिटेडने (केएसईबीएल) या स्टेडियमचा इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आहे.
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमने इलेक्ट्रिसिटी बोर्डचे 2.36 कोटी रुपये थकवले आहे. त्यामुळेच बोर्डने स्टेडियमचा इलेक्ट्रिक सप्लाय खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
झाले असे की, मागील वर्षापासून या स्टेडियमचे लाईटबिल दिलेले नाही. याचीच मागणी केएसईबीएल करत आहे. अशी स्थिती असताना पाणी विभागानेही पाण्याची लाईन कर करण्याची धमकी दिली आहे. कारण त्यांचेही बिल थकीत आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सामन्याच्या 10 दिवसांअगोदर ग्रीनफिल्ड स्टेडियमचा इलेक्ट्रिक सप्लाय खंडीत केला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जनरेटरच्या मदतीने स्टेडियमच्या सुधारणीकरणाचे काम सुरू आहे.
या प्रकरणाबाबत राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, “यासाठी केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड विभाग जबाबदार आहे. ज्यांनी मागील तीन वर्षापासून पाणी आणि इलेक्ट्रिक बिल दिलेले नाही. तर केरळ स्पोर्ट्सचे म्हणणे आहे की, राज्य सरकारच्या वार्षिक निधीशिवाय हे बिल देण्यास असमर्थ आहे.”
ग्रीनफिल्डवर आतापर्यंंत दोन टी20 सामने खेळले गेले आहेत. यातील पहिला सामन भारताने 2017मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध 2019मध्ये खेळला आहे. हा सामना भारताने आठ विकेट्सने गमावला.
ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून आठवा पुरूष टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेत खेळणारे संघ सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या टी20 मालिका भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघासाठीही महत्वाच्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका
क्रिडाविश्वात हळहळ! चालू मॅरथॉन स्पर्धेत धावपटूवर ओढावला मृत्यू