---Advertisement---

धक्कादायक! ‘या’ दिग्गजाने दीपक चाहरला दिला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला

---Advertisement---

भारताने श्रीलंकेच्या दरम्यान झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने ८२ चेंडूत ६९ धावा काढून भुवनेश्वर कुमारसोबत आठव्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली. त्याच्या या खेळीनंतर चाहत्यांसोबत अनेक माजी क्रिकेटपटू देखील त्याचे कौतुक करत आहेत. भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी दीपक चाहरविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

दीपकला मिळाला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज व माजी गोलंदाजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद यांनी दीपक चाहरविषयी एक ट्वीट केले. ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू व भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यावर दीपक चाहरला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिल्याचा आरोप केला.

प्रसाद यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘दीपक चाहरला ग्रेग चॅपेल यांनी राजस्थान रणजी संघाचे सल्लागार असताना उंचीच्या कारणामुळे क्रिकेट सोडून इतर क्षेत्रात कारकीर्द करण्याविषयी सल्ला दिलेला. त्याच दीपकने भारताला एकहाती विजय मिळवून दिला. यातून बोध घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि परदेशी प्रशिक्षकांना जास्त गंभीरतेने घेऊ नका. याला काही अपवाद देखील आहेत. संघ आणि फ्रँचायझींनी शक्य तितक्या भारतीय प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांना भारतीय प्रतिभावंत खेळाडूंविषयी चांगली माहिती असते.’

भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषकात व्यंकटेश प्रसाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

भारतीय संघासोबत वादग्रस्त राहिला होता चॅपेल यांचा कार्यकाळ
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार राहिलेले ग्रेग चॅपेल काही काळ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांचा हा कार्यकाळ कमालीचा वादग्रस्त राहिलेला. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला संघाबाहेर काढल्याने त्यांच्यावर टीका झालेली. त्यांच्याच काळात २००७ वनडे विश्वचषकात भारताला साखळी फेरीतून बाहेर पडावे लागलेले. भारतीय संघात दुफळी माजविण्याचा आरोप त्यांच्यावर नेहमी केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या-

-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

-हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

-आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---