---Advertisement---

विव रिचर्ड्सशी तुलना झाल्यावर ‘ही’ होती विराटची प्रतिक्रिया, ग्रेग चॅपेल यांनी सांगितला किस्सा

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व एकेकाळी भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल यांनी २०१४ सालचा विराट कोहली बद्दलचा किस्सा आपल्या सिडनी मॉर्निंग वृत्तपत्रातील कॉलम मध्ये उलगडला आहे. २०१४ साली इंग्लंड मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा मध्यम गती गोलंदाज जेम्स अँडरसनने विराटला अनेक वेळा बाद केले. स्टम्प्स पासून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट सातत्याने अडचणीत जाणवत होता. हा निराशाजनक दौरा संपल्यानंतर विराटने माजी खेळाडू लालचंद राजपूत आणि सचिन तेंडुलकर यांच्या सोबत १४ दिवस सराव करून आपल्या फलंदाजीतील उणीवा दूर केल्या होत्या.

लालचंद राजपूत यांनी विव रिचर्ड्सशी केली तुलना 
या सरावा दरम्यान एकदा लालचंद राजपूत यांनी विराटला सांगितले की तू मेहनत केलीस तर विव रिचर्ड्स यांच्या प्रमाणे महान फलंदाज होवू शकतोस. यावर विराट म्हणाला, “नाही सर. ते फार मोठे खेळाडू आहेत.”

ग्रेग चॅपेल यांनी केली स्तुती 
ग्रेग चॅपेल यांनी आपल्या कॉलम मध्ये विराटची स्तुती केली आहे. २०१४ साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला. ४ कसोटी सामन्यांच्या या दौऱ्यात विराटने उत्तम कामगिरी करत ४ शतकं  केले होते. ग्रेग चॅपेल यांनी आपल्या कॉलमच्या शेवटी विराट बद्दल लिहताना म्हंटले, “सन्मान सहज मिळत नाही. तो कमवावा लागतो.” ऑस्ट्रेलियन दिग्ग्जाने केलेल्या या स्तुतीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची मान नक्कीच अभिमानाने उंचावली असेल.

संबंधित बातम्या:
कोहली नव्या भारतीय संघाचा प्रतीक, कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
– दुसऱ्या सराव सामन्यात कोहली अनुपस्थित, कर्णधारपद रहाणेकडे; अशी आहे भारतीय प्लेईंग इलेव्हन
– आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर: केएल राहुल आणि विराट कोहलीची आगेकूच, पटकाविले हे स्थान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---