---Advertisement---

तू क्रिकेट सोडून दे असं ज्या खेळाडूला सांगितलं तो उद्या करतोय भारताकडून पदार्पण

On: सोमवार, जुलै 2, 2018 6:29 PM
---Advertisement---

भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी  दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी युवा गोलंदाज दीपक चहरची निवड झाली आहे.

दीपक चहरच्या या निवडीवर भारताचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्राेने एक गुपीत उघड केले आहे.

आकाश चोप्राने त्याच्या फेसबुक अकाउंट वर एक व्ही़डीओ शेअर करून भारताचे माजी वादाग्रस्त प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे दीपक चहर 11 वर्षापूर्वी काय मत होते ते सांगितले.

ग्रेग चॅपेल भारताचे प्रशिक्षक होते त्यावेळी दीपक चहरची ग्रेग चॅपेल यांच्याशी भेट झाली होती त्यावेळी ग्रेग चॅपेल यांनी चहरला क्रिकेट सोडून द्यायचा सल्ला दिला होता.

तसेच तो कधीही क्रिकेटपटू होऊ शकणार नाही असे म्हणाले होते.

मात्र आता ग्रेग चॅपेल यांचे अंदाज चूकीचे ठरवत दीपक चहरने इंग्लडला गेलेल्या भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळवले आहे.

दीपक चहरने गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 11 व्या मोसमात दीपक चहरने 10 सामन्यात 12 बळी मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…

-फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment