नव्याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सामील झालेला गुजरात टायटन्स संघ इतर सर्व संघांवर भारी ठरला. मंगळवारी (दि. १०) आयपीएल २०२२मधील ५७वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने लखनऊला ६२ धावांंनी पराभूत केले आणि प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री केली. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा गुजरात हा पहिला संघ ठरला आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी गुजरातने निर्धारित २० षटकांमध्ये ४ विकेट्स गमावत १४४ धावा चोपल्या आणि लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला हे आव्हान काही पेलता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १३.५ षटकात अवघ्या ८२ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे गुजरातने शानदार विजय साकारला.
That's that from Match 57.@gujarat_titans win by 62 runs and become the first team to qualify for #TATAIPL 2022 Playoffs.
Scorecard – https://t.co/45Tbqyj6pV #LSGvGT #TATAIPL pic.twitter.com/PgsuxfLKye
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनेही अशाच प्रकारे जिंकले होते आयपीएलचे विजेतेपद
विशेष म्हणजे, गुजरातच्या विजयानंतर अशी आकडेवारी समोर आली आहे, ज्यातून असे दिसते की, या हंगामाचे विजेतेपद गुजरात संघ आपल्या नावावर करू शकतो. यामागील कारण म्हणजे, आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघ १८ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला होता. त्याचबरोबर त्यांनी आयपीएलचे विजेतेपदही पटकावले होते. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद होते.
त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने १८ गुण मिळवत प्लेऑफमध्ये सर्वात पहिली एंट्री केली होती. तसेच, त्यांनी आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते. हे चेन्नईचे चौथे आयपीएल विजेतेपद होते. यानंतर आता गुजरात संघानेही आयपीएल २०२२मध्ये १८ गुण मिळवत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये एंट्री केली आहे. त्यामुळे असे म्हणता येऊ शकते की, गुजरात संघ आयपीएल २०२२चा किताब पटकावू शकतो.
गुणतालिकेत गुजरात ‘टॉपर’
आयपीएल २०२२मधील ५७ सामन्यांनंतर गुजरातने लखनऊला पराभूत करत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले. गुजरात संघाचे सध्या १८ गुण आहेत. तसेच, लखनऊ संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊला ६२ धावांनी नमवत गुजरात पुन्हा ‘टेबल टॉपर’, बनला प्लेऑफमध्ये पोहोचणारा IPL 2022मधील पहिला संघ
कोण आहे शुबमन गिलची सर्वात मोठी प्रेरणा? म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर…’