इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 स्पर्धेत बुधवारी (दि. 10 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. हा सामना अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार खेचत गुजरात टायटन्स संघाने जिंकला आणि राजस्थानचा विजयरथ देखील रोखला. गुजरातच्या या रोमहर्षक आणि संस्मरणीय विजयाचे शिल्पकार ठरले ते तीन खेळाडू. एक म्हणजे स्वतः कर्णधार शुबमन गिल आणि दुसरे दोन म्हणजे रशीद खान आणि राहुल तेवतिया. त्यातही शुबमन गिलने अवघ्या 44 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 72 धावांची वादळी खेळी केली. त्याजोरावर गुजरातने हा विजय मिळवला. शुबमनच्या या खेळीने विक्रमांचे अनेक मनोरे रचले आहेत. ते खालीलप्रमाणे,
शुभमन गिल बनला आयपीएलमध्ये 3000 धावा करणारा सर्वात तरूण खेळाडू (Shubman Gill becomes the youngest to score 3000 IPL runs)
24 वर्षे 215 दिवस – शुबमन गिल SHUBMAN GILL
26 वर्षे 186 दिवस – विराट कोहली Virat Kohli
26 वर्षे 320 दिवस – संजू सॅमसन Sanju Samson
27 वर्षे 161 दिवस – सुरेश रैना Suresh Raina
27 वर्षे 343 दिवस – रोहित शर्मा Rohit Sharma
सर्वात कमी इनिंगमध्ये आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण करणारे भारतीय (Least Innings taken by Indian to reach 3000 IPL runs)
80 जाव – केएल राहुल KL Rahul
94 – शुबमन गिल Shubman Gill*
103 – सुरेश रैना Suresh Raina
104 – अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane
109 – रोहित शर्मा Rohit Sharma
109 – शिखर धवन Shikhar Dhawan
110 – विराट कोहली Virat Kohli
110 – गौतम गंभीर Gautam Gambhir
सर्वांत कमी इनिंगमध्ये आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण (Fastest Inngs to 3000 runs in IPL)
75 – ख्रिस गेल Gayle
80 – केएल राहुल Rahul
85 – जोस बटलर Buttler
94 – शुबमन गिल Gill*
94 – वॉर्नर आणि फाफ डू प्लेसिस Warner/du Plessis
99 – क्विंटन डि कॉक de Kock
सर्वांत कमी इनिंगमध्ये टी20 मध्ये 4000 धावा करणारे भारतीय (Quickest Innings to 4000 T20 Runs by Indians)
116 – ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad
117 – केएल राहुल KL Rahul
129 – शुबमन गिल Shubman Gill*
अधिक वाचा –
– क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला! ‘या’ 8 मैदानांवर होणार 2027 एकदिवसीय विश्वचषकाचे सामने
– महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत
– भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल