इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील 35वा सामना गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना मंगळवारी (दि. 25 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात मुंबईला 55 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अशात या सामन्यातील मुंबईचा फलंदाज नेहाल वढेरा याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ही चर्चा त्याचे कौतुक करण्यासाठी होत नसून त्याच्यावरील टीकेसंदर्भात आहे. त्याच्या वागणूक समालोचकांना आणि क्रिकेटप्रेमींनाही पटलेली नाहीये.
पीयुषला क्रीझवरून हटण्याचा इशारा
झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाच्या डावातील 18वे षटक गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा (Mohit Sharma) टाकत होता. यावेळी मोहितने पहिला चेंडू पीयुष चावला (Piyush Chawla) याला टाकताच चेंडू यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे गेला. इकडे, दुसऱ्या बाजूला उभा असलेला नेहाल वढेरा (Nehal Wadhera) वेगान धावत फलंदाजाच्या बाजूला आला. पीयुष अचानक नेहालला जवळ येताना पाहून हैराण झाला. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा नेहालने स्ट्राईकर एंडला पोहोचून पीयुषला क्रीझवरून हटण्याचा इशारा केला. जेणेकरून तो धावबाद होण्यापासून वाचू शकेल. शेवटी पीयुषने त्याच्या विकेटचा त्याग करत क्रीझ सोडली. त्यामुळे तो धावबाद झाला.
या घटनेचे फोटो चाहते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. तसेच, सामना चालू असताना समालोचकांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. काही चाहत्यांनी यावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर ट्वीट करत म्हणाला की, “नेहाल वढेरा काय आहे हे? तू 12 षटकार मारणार आहेस की काय?”
Nehal wadhera what is this ?
are you going to hit 12 sixes or what!#GTvMI pic.twitter.com/MPy49FRPkX— SportsDab (@sportsdab) April 25, 2023
अर्जुन तेंडुलकरला इशारा करत विचारला प्रश्न
एवढंच नाही, तर यानंतर स्ट्राईकर एंडला उभ्या असलेल्या वढेराला मोहितने पुढील चेंडू टाकला, तेव्हा नॉन-स्ट्राईकर एंडवरून अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) वेगाने धावत आला. इथेही पुन्हा एकदा गोंधळ उडाला आणि नेहाल धाव न घेण्याच्या मूडमध्ये दिसला. अर्जुन जसा स्ट्राईकर एंडवर पोहोचला, तेव्हा नेहाल त्याला इशारा करत प्रश्न विचारताना दिसला.
Nehal Wadhera was denying run & honestly Arjun didn't care about it!
Non strikers had almost reached other end and Nehal was showing some frustration for running single!
Not sure why as game was almost gone!#TATAIPL#IPL2023#GTvMI pic.twitter.com/ttiC6CkEMb
— Nilesh G (@oye_nilesh) April 25, 2023
What is Nehal Wadhera trying to do here? What he did with Piyush Chawla was so not ON and then denying singles and doubles with Arjun? 50 karna tha kya apna bhai?
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) April 25, 2023
झाले असे की, नेहालला स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायची होती. मात्र, अर्जुनलाही पुढील चेंडूवर त्याचे खाते खोलायचे होते. त्यामुळेच दोन्ही खेळाडूंमध्ये गोंधळ उडाला. अर्जुनने पुढील चेंडूवर एक धाव घेत नेहालला स्ट्राईकवर पाठवले. मात्र, चौथ्या चेंडूवर खराब शॉट खेळून तो मोहम्मद शमी याच्या हातून झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 40 धावा केल्या. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर याने 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. मात्र, त्यालाही 9 चेंडूत 13 धावा करत तंबूत परतावे लागले. (gt vs mi cricketer nehal wadhera showed attitude first removed piyush chawla from the crease read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गतविजेत्या गुजरातविरुद्ध हारताच गोलंदाजांवर संतापला रोहित; म्हणाला, ‘फलंदाज पाहून तरी…’
गुजरात टायटन्सने केला मुंबई इंडियन्सचा पाडाव! 55 धावांनी विजय मिळवत हार्दिक सेना दुसऱ्या क्रमांकावर