---Advertisement---

GT vs MI: ‘हा’ ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

On: रविवार, मार्च 30, 2025 6:18 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 18व्या हंगामातील नववा सामना काल (29 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना गुजरातने 36 धावांनी जिंकला. 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला केवळ 160 धावा करता आल्या, परिणामी संघाने 36 धावांनी सामना गमावला.

टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना गुजरात टायटन्सने 20 षटकात 196 धावा केल्या. ज्यात साई सुदर्शन (63 धावा) गिल (38 धावा), बटलर (39 धावा) यांनी मोलाचे योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला माजी कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला, सलग दोन चाैकार मारुन तो बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने क्लिनबोल्ड केले. यांनतर यष्टीरक्षक फलंदाज रिकेल्टन देखील 6 धावांवर बाद झाला.

तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या तिलक वर्माने 39 धावा तर केल्या पण त्याची स्ट्राईक रेट फारच कमी होती. त्याने 36 चेंडूत 39 धावा केल्या. फलंदाजांच्या संथ खेळीने सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. कर्णधार हार्दिक पांड्याही 17 चेंडूत केवळ 11 धावा करुन बाद झाला. तथापि सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 48 धावा केल्या, पण त्याच्या क्षमतेला पाहता तो अपेक्षेपेक्षा संथ खेळला. एकूणच मधल्या षटकांमध्ये मुंबईची खराब फलंदाजी झाली, ज्यामुळे संघाने सामना गमावला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---