आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 38 धावांनी हरवले. या सामन्यात गुजरात टायटन्सने अष्टपैलू कामगिरी केली. संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात खेळताना गुजरातने 20 षटकात 224/6 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला 186 धावांवर रोखले आशाप्रकारे गुजरातने 38 धावांनी विजय मिळवला.
सनरायझर्स हैदराबादला 225 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला जलद सुरुवात दिली, परंतु हेड 20 धावांवर बाद झाला. अभिषेक वेगळ्या लयीत दिसला, त्याने 74 धावांची वादळी खेळी खेळली. जो पर्यंत तो स्टाईकवर तो पर्यंत सामना हैदराबादच्या बाजूने झुकलेला, जेव्हा तो बाद झाला तेव्हा गुजरातने मजबूत पुनरागमन केले. ईशांत शर्माने त्याला झेलबाद केले.
I.C.Y.M.I
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2025
Scintillating shots on display ????
Abhishek Sharma with a spirited fight for #SRH ????
Updates ▶ https://t.co/u5fH4jPU3a#TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/2bng0btdPS
अभिषेकने 41चेंडूत 74 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने हेनरिक क्लासेनसोबत 57 धावांची भागीदारीही केली. जिथे संघाला क्लासेनकडून मोठी आणि वेगवान खेळी अपेक्षित होती, तिथे क्लासेनही फक्त 23 धावा काढून बाद झाला. सलग विकेट गेल्याने आवश्यक धावगती इतकी वाढली होती की हैदराबादच्या पुढील फलंदाजांना 225 धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य झाले. ज्यामुळे संघाचा 38 धाावांनी पराभव झाला.






