---Advertisement---

मावळ तालुक्यात क्रिकेटच्या मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी – व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 14, 2023 5:12 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी चांदखेड इथे बारमुख क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन केलं. यावेळी पालकमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह काही आवरला नाही आणि हातात बॅट घेऊन चंद्रकांत पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या समवेत मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

रविवारी (12 मार्च) मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी सर्वप्रथम जाहीर कार्यक्रमात तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आदेशपत्र वाटप केले. त्यानंतर बारमुख क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट लीगसाठी स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1634825097130409984?s=20

‘स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय झाली आहे. याशिवाय येळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आणखी स्टेडियम उभारावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,’ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित होते.
(Guardian Minister Chandrakant Patil batted in Maval taluka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझी अंतराआत्मा सांगित आहे, आयपीएलमध्ये एका षटकात…’, युवा खेळाडू फूल कॉन्फिडन्समध्ये
‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---