इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर गुजरात टायटन्सला आपल्या दुसऱ्या आयपीएल अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना गुजरातला आयपीएल इतिहासात प्रथमच सर्वबाद करण्याची कामगिरी करून दाखवली.
मागील वर्षी सर्वात मोठी बोली लावत गुजरात टायटन्स संघ आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. त्यांनी सर्वांना चकित करत आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएल जिंकण्याची दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्यांनी साखळी फेरीत पहिले स्थान पटकावले. यादरम्यान संघाने 30 सामने खेळले होते. या 30 सामन्यांमध्ये गुजरात संघ प्रथम अथवा दुसऱ्यांदा फलंदाजी करताना एकदाही सर्वबाद झाला नाही.
मात्र, चेन्नईविरुद्ध झालेल्या क्वालिफायर एकच्या सामन्यात त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. चेन्नई ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे व रवींद्र जडेजा यांच्या उपयुक्त खेळाच्या जोरावर 172 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल याने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी केली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने ते चेन्नईच्या धावसंख्येच्या काहीसे दूर राहिले. त्याचवेळी गुजरातच्या डावातील अखेरचा चेंडू खेळत असलेल्या मोहम्मद शमी याला मथिशा पथिराना याने दीपक चहरच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. यासोबतच गुजरात टायटन्स संघ 31 व्या सामन्यात सर्वबाद झाला.
या सामन्यात पराभूत झाले असले तरी गुजरातला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ते लखनऊ सुपरजायंट्स व मुंबई इंडियन्स यांच्यातील विजेत्याशी भिडतील. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाईल.
(Gujarat Titans First Time All Out In IPL CSK Did It)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच