आयपीएलचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी अनेक मोठे खेळाडू आपली जुनी फ्रँचायझी सोडून नव्या फ्रँचायझीसोबत खेळताना दिसतील. मुंबई इंडियन्सनं आपला स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला रिटेन केलेलं नाही. आता गुजरात टायटन्सनं किशनला आपल्या संघात सामील होण्याबाबत मोठा इशारा दिला आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. त्यानं राशिदला संघात ठेवण्यासाठी स्वत: कमी पगार स्वीकारला. तरुण गिलच्या या निर्णयाचं खूप कौतुक झालं. इशान किशन आणि शुबमन गिल यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता दोघे एकाच संघाकडून खेळताना दिसू शकतात. फ्रँचायझीनं एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हा इशारा दिला आहे.
वास्तविक, गुजरात टायटन्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये किशन आणि गिल अहमदाबादच्या स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी जाताना दिसतायेत. हा व्हिडिओ आयपीएलच्या मागील हंगामातील आहे. व्हिडिओमध्ये गिल आणि किशन एकमेकांशी मस्ती करताना दिसत आहेत. गुजरातनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “जीवन एक प्रवास आहे. उद्या काय होईल कोणास ठाऊक?”
🎶 Zindagi ek safar hai suhaana, yahaan kal kya ho, kisne jaana? 😉#AavaDe pic.twitter.com/C9JhNHcUCF
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 9, 2024
मुंबईनं किशनला संघातून रिलिज केलं असलं, तरी लिलावात काहीही होऊ शकतं. मुंबईसाठी चांगली गोष्ट म्हणजे ते इशानसाठी राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरू शकतात. मात्र येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गुजरातकडे लिलावासाठी 69 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर मुंबईकडे फक्त 45 कोटी रुपये आहेत.
लिलावात इशान किशनवर मोठी बोली लागली, तर मुंबईसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता लिलावात संघ कशा प्रकारचं धोरण अवलंबतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
AUS vs PAK: पाकिस्तानी वेगवान आक्रमणासमोर ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, मालिका गमावण्याचा धोका..!
SA VS IND; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला इतिहास रचण्याची संधी
अद्भुत! एका हातानं पकडला सीमारेषेकडे जाणार चेंडू, फलंदाजाचाही विश्वास बसेना; VIDEO पाहा