सध्या भारतासह विदेशात आयपीएलच्या १५ व्या हंगामाची चर्चा सुरू आहे. गुजरात टायटन्स हा संघ चालू हंगामात पहिल्यांदाच आयपीएल खेळत आहे. परंतु त्यांचे प्रदर्शन या स्पर्धेच्या बलाढ्य संघांपेक्षा अधिक चांगले राहिले आहे. गुजरातला त्यांचा पुढचा सामना शनिवारी (२३ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळायचा आहे. यापूर्वी संघाने खेळाडूंच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खेळाडू कडक उन्हात सराव करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. देशभारत सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि त्याच्या परिणाम खेळाडूंच्या सराव सत्रात स्पष्ट दिसत आहे. गुजरात टायटन्सने शुक्रवारी शेअर केलेल्या या व्हिडिओत संघातील खेळाडू उन्हामुळे बेजार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. असे असले, तरी खेळाडूंचे सराव सत्र मात्र न थांबता सुरू आहे. उन्हामुळे खेळाडूंना सराव करताना थोडा त्रास नक्कीच होत आहे, पण त्यावर ते उपाय देखील करत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज राशिद खानने उनामुळे डोक्यावर टॉवेल घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. सराव करताना राशिद त्याच्या डोक्यावर थंड पाणी घेताना देखील दिसत आहे. राशिदव्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूना देखील उन्हामुळे त्रास होत असल्याचे दिसते. गुजरात टायटन्सच्या सोशल मीडिया टीमने उन्हाचा सामना करत असलेल्या त्यांच्या संघाचा व्हिडिओ शेअर करत असताना त्यावर “हाय गर्मी,” हे हिंदी गाणेही वापरले आहे.
𝐇𝐚𝐲𝐞 𝐆𝐚𝐫𝐦𝐢 🥵☀️#SeasonOfFirsts #AavaDe #TATAIPL
[🎵: Garmi Song | Street Dancer 3D] pic.twitter.com/kE4Im4ziqD— Gujarat Titans (@gujarat_titans) April 22, 2022
दरम्यान, गुजरातचे चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच अप्रतिम आहे. सुरुवातीच्या पाच सामन्यापैकी त्यांनी ५ जिंकले आहेत, तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघासाठी सर्वाधिक २२८ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजांमध्ये राशिदचे प्रदर्शन सर्वोत्तम आहे. त्याने आतापर्यंत ६ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.