इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 29 एप्रिल) डबल हेडर सामन्यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना गुजरात संघाने 7 विकेट्सने खिशात घातला. या विजयात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही मोलाचे योगदान दिले. गुजरातचा हा सहावा विजय होता. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि 7 विकेट्सने सामना खिशात घातला.
We WONNNNNN!! 👊⚡️👊⚡️#GT – 180/3 (17.5 overs)#KKRvGT | #AavaDe | #TATAIPL 2023
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 29, 2023
गुजरातची दमदार फलंदाजी
कोलकाताच्या 180 धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून विजय शंकर (Vijay Shankar) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 24 चेंडूत नाबात 51 धावांचे योगदान दिले. यामध्ये 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर शुबमन गिल याने 49 धावा, डेविड मिलर याने नाबाद 32 धावा आणि कर्णधार हार्दिक पंड्या याने 26 धावा केल्या. वृद्धिमान साहाला यावेळी 10 धावाच करता आल्या.
यावेळी कोलकाताकडून गोलंदाजी करताना हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
गुरबाजची वादळी खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. त्याने 39 चेंडूत 81 धावा ठोकल्या. यामध्ये 5 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेल याने 34 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार नितीश राणा हा फक्त 4 धावांवर बाद झाला, तर रिंकू सिंग आणि एन जगदीशन यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. वेंकटेश अय्यर यानेही 11 धावांचे योगदान दिले.
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने 4 षटके गोलंदाजी करताना 33 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जोशुआ लिटल आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
A 🔝 of the Table victory in Kolkata for the @gujarat_titans 🙌🏻
They ace the chase yet again to register their fourth away win in a row 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/sR5TSGeJ94
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
या विजयासह गुजरात संघाने हंगामातील सहावा विजय साकारला. यामुळे त्यांचे 12 गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले आहेत. यामुळे अव्वलस्थानी असलेला राजस्थान रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. (Gujarat Titans won by 7 wkts against Kolkata Knight Riders)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLच्या 40व्या सामन्यात भिडणार DC vs SRH संघ, नाणेफेक हैदराबादच्या पारड्यात; दोन खेळाडूंचे पदार्पण
लय वाईट! ‘या’ 3 धुरंधरांना IPL 2023मध्ये मिळेना संधी, फलंदाजीने मैदानात आणू शकतात वादळ