गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना पार पडला. मंगळवारी (दि. २४ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील ११वा विजय होता. या विजयासह गुजरातने फायनलचे तिकीट मिळवले. या विजयात कर्णधार पंड्या आणि डेविड मिलर विजयाचे हिरो ठरले. मिलरला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १८८ धावा चोपल्या. हे आव्हान गुजरात संघाने ३ विकेट्स गमावत १९.३ षटकात पूर्ण केले.
First Playoffs. First Win. First Final.#SeasonOfFirsts 🔥#GTvRR | #AavaDe | #IPLPlayoffs | #TATAIPL pic.twitter.com/lq9Cg9ajGM
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 24, 2022
गुजरातकडून फलंदाजी करताना डेविड मिलर याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८ चेंडूत ६८ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या याने ४० धावांचे योगदान दिले. मिलर आणि पंड्या यांनी शतकी भागीदारीही पूर्ण केली. तसेच, मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी ३५ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला शून्य धावांवर तंबूत परतावे लागले.
Congratulations to the @gujarat_titans as they march into the Final in their maiden IPL season! 👏 👏
Stunning performance by @hardikpandya7 & Co to beat #RR by 7⃣ wickets in Qualifier 1 at the Eden Gardens, Kolkata. 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/yhpj77nobA
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना ओबेद मॅकॉय आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून जोस बटलर (Jos Buttler) याने तुफान फटकेबाजी केली. बटलरने ५६ चेंडूंचा सामना करताना ८९ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि १२ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसन याने ४७ धावा, तर देवदत्त पडिक्कल याने २८ धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला साध्या १० धावांचा आकडाही पार करता आला नाही.
यावेळी गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल, साई किशोर आणि कर्णधार हार्दिक पंड्या याने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
आयपीएल २०२२मधील एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. २५ मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामनाही कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्धशतक न करताही सॅमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद, बनला फक्त दुसरा भारतीय पठ्ठ्या
सामना जिंकायचं जाऊद्या ‘या’ नकोशा विक्रमात धोनीला वरचढ ठरलाय सॅमसन, पाहा आकडेवारी
तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय