प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १८ तारखेला प्रो कबड्डीचा १२९ वा सामना तमिळ थलाईव्हाज आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. गुजरात जायंट्सने ४३-३३ च्या फरकाने हा महत्त्वपूर्ण सामना जिंकत त्यांचे बाद फेरीतील आव्हान जिंवत ठेवले आहे.
Another 𝙶𝙸𝙰𝙽𝚃 victory for the record! 😉#CHEvGG #VIVOProKabaddi #VIVOProKabaddi pic.twitter.com/U7LOMHawcZ
— ProKabaddi (@ProKabaddi) February 18, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १२८ वा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात झाला. दबंग दिल्लीने ४०-३२ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा सामना जिंकत दबंग दिल्लीने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान पक्के केले आहे. तसेच प्रो कबड्डीचा १२७ वा सामना पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. बेंगाल वॉरियर्सने सामन्यात दमदार पुनरागमन करत ४३-३६ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे. सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत बेंगालचा संघ पुणेपेक्षा १० गुणांनी मागे होता.
The Warriors finished off in style, a top-2 finish for the Dabangs & a step closer for the Giants 🤩
Check out the best 📸📸 from today's #SuperhitPanga 🥳
Visit https://t.co/EWWLNMn2lc for more! 🔗#PUNvBEN #TTvDEL #CHEvGG #VIVOProKabaddi pic.twitter.com/mLdvUL5lzv
— ProKabaddi (@ProKabaddi) February 18, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २१ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८१ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ७५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६८ गुण), बेंगलुरू बुल्स (६६ गुण) आणि हरियाणा स्टिलर्स (६३ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: तेलुगू टायटन्सवर दबंग दिल्ली पडली भारी, ८ गुणांनी केली मात
दमदार पुनरागमनासह ‘बेंगाल वॉरियर्स’ने ‘पुणेरी पलटण’ला चारली पराभवाची धूळ
विराट, रिषभच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या टी२०त भारताचा ८ धावांनी विजय, मालिकाही खिशात