---Advertisement---

उत्कंठावर्धक सामना! बरोबरीनंतर सुपर ओव्हरचा थरार, अखेर निकोलसच्या पठ्ठ्यांपुढे पोलार्डचा संघ नामोहरम

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 10:20 AM
---Advertisement---

टी२० क्रिकेट अन् त्यातही सुपर ओव्हर, म्हणजे सामना दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन. अजून जगप्रसिद्ध टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात होण्यास अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. परंतु दुसरीकडे वेस्ट इंडिजमध्ये चालू असलेली प्रसिद्ध कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ (सीपीएल) क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधते आहे. याच लीगमधील अकरावा सामना रोमहर्षक ठरला आहे.

बुधवार रोजी (०१ सप्टेंबर) सेंट किट्स येथे त्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यात हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना त्रिनबागो संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १३८ धावा जोडल्या. प्रत्युत्तरादाखल गयाना संघही २० षटकअखेर ९ विकेट्सच्या नुकसानावर १३८ धावा करू शकला. परिणामी या बरोबरी झालेल्या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील गयाना संघाचे यात बाजी मारली.

उभय संघांमध्ये बरोबरी
नाणेफेकीचा कौल गयानाचा कर्णधार निकोलसच्या बाजूने लागल्यानंतर त्याने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे सुरुवातीला कायरन पोलार्डच्या नेतृत्त्वाखालील त्रिनबागो संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. मध्यक्रमातील फलंदाज कॉलीन मुनरोने फलंदाजी करताना सर्वाधिक ३२ धावा फटकावल्या. २८ चेंडूंचा सामना करताना प्रत्येकी २ षटकार आणि चौकार खेचत त्याने ही धावसंख्या केली. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर सुनिल नारायण (२१ धावा) आणि इसुरू उडाना (२१ धावा) यांनीही संघाला धावांची १०० पार करण्यास मदत केली. कर्णधार पोलार्ड मात्र अवघ्या १३ धावांचे योगदान देऊ शकला.

गयानाकडून गोलंदाजी करताना रोमॅरिओ शेफर्डपुढे प्रतिस्पर्धींनी गुडघे टेकले. ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत त्याने ३ विकेट्स चटकावल्या. त्याच्या साथीला मोहम्मद हाफिजनेही ३ विकेट्स घेतल्या.

त्रिनबागोच्या १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गयानाचा कर्णधार निकोलसने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. त्याच्याबरोबर शिमरॉन हेटमायरनेही २७ धावा जोडल्या. मोहम्मद हाफिज (१६ धावा), शोएब मलिक (१४ धावा), रोमॅरिओ शेफर्ड (१८ धावा) आणि नवीन-उल-हक (नाबाद १३ धावा) यांनीही धावफलक हालता ठेवला. अखेर त्यांना २० षटकांमध्ये १३८ धावांपर्यंत मजल मारता आली आणि सामन्यात बरोबरी झाली.

https://twitter.com/CPL/status/1433130824271020035?s=20

सुपर ओव्हरमध्येही काट्याची टक्कर
बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली गेली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना गयानाने ५ चेंडूंमध्ये केवळ ६ धावा केल्या. दरम्यान त्रिनबागोचा गोलंदाज सुनिल नारायणने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात त्रिनबागो संघ तर केवळ ४ धावांपर्यंत मजल मारू शकला. गयानाचा गोलंदाज रोमॅरियो शेफर्डने कर्णधार पोलार्डची विकेट घेत फक्त ४ धावा दिल्या अन् सामना खिशात घातला.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकासाठी ‘या’ दिवशी निवडली जाणार ‘विराटसेना’; १५ सदस्यीय संघात कोणाची लागेल वर्णी?

गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!

ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---