भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दावा केला आहे की, जर ते इंडियन प्रीमियर लीग लिलावात खेळाडू म्हणून सहभागी झाले असते, तर त्यांना एक दशलक्ष डॉलर्सचा करार मिळाला असता. विशेषत: सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूंना नेहमीच जास्त मागणी असते, यामुळे रवी शास्त्रींना (Ravi Shastri) नक्कीच आयपीएलमध्ये प्रचंड पैसा मिळाला असता. भारतासाठी खेळलेल्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे रवी शास्त्री. त्यांच्या दिवसांमध्ये ते तुफानी क्रिकेट शैलीसाठी खूप लोकप्रिय होते.
अलीकडे लिलावात खेळाडू म्हणून त्यांना किती पैसे मिळतील? याबद्दल विचारले असता शास्त्री म्हणाले की, ते १५ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये आरामात असते आणि फ्रँचायझीचे नेतृत्वही केले असते.
क्रिकइन्फोशी बोलताना शास्त्री म्हणाले, “१५ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आरामात असतो. सोपे आणि संघाचा कर्णधारही असतो. त्यात काही प्रश्नच नाही. त्यासाठी जास्त मेंदूची गरज नाही.” आयपीएल लिलावाने अनेक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले हे सर्वज्ञात सत्य आहे. युवराज सिंग, रवींद्र जडेजा, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यांसारख्या अनेक भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी लिलावात मोठी रक्कम मिळवली आहे.
रवी शास्त्रींबद्दल बोलायचे तर, त्यांनी आक्रमक फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी केली आहे. त्यांनी बडोद्याच्या टिळक राज विरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईकडून खेळताना एका षटकात सहा षटकार मारले होते. शास्त्री हे मुंबईचे रहिवासी होते. रवी शास्त्री यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघासाठी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यांनी दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ३८३० आणि ३१०८ धावा केल्या आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८० बळी देखील घेतले आहेत.
रवि शास्त्री यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचे (Team India) प्रशिक्षकपद भूषवले आहे. प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली आहे. ते भारतासाठी पहिला विश्वचषक (world cup 1983) जिंकणाऱ्या संघाचा भाग देखाील होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह सॅमसनला म्हणतोय, ‘कसोटीपण जिंकवली, आता बॅटच्या स्टिकरवर माझं नाव हवं’; Video व्हायरल
IPL2022| गुजरात वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!