मुंबई । पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक ‘दुसरा’ चेंडू फेकण्यात माहिर होता. इंग्लंडमध्ये 1999 साली विश्वचषकात घडलेला एक किस्सा नुकताच मुलाखतीत त्याने सांगितला आहे. या विश्वचषकात त्याने आपल्या पत्नीला कपाटात लपवून ठेवले होते. या विश्वचषक स्पर्धेच्या मध्यंतरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबास मायदेशात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
पीसीबीने सांगितलेला हा नियम सकलेन मुश्ताकला आवडला नाही. ‘बियॉन्ड द फिल्ड’ या कार्यक्रमात फॅनने सकलेन मुश्ताकला यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर सकलेन म्हणाला, “1998 साली माझे लग्न झाले होते. माझी पत्नी लंडनमध्ये राहत होती. 1999 च्या विश्वचषकात मी माझ्या पत्नीसोबत राहत होतो. त्यावेळेस मी दिवसभर मैदानावर हार्डवर्क करत होतो आणि संध्याकाळी ती माझ्या पतीसोबत वेळ घालवायचो. पीसीबीने अचानक परिवारास मायदेशात पाठवण्यात सांगितले. मी आमचे मुख्य प्रशिक्षक रिचर्ड पायबस यांना विचारले की, सर्व काही ठीक चालत असताना अचानक हा निर्णय का घेतला?”
” मी या नियमाचे आचरण न करण्यासाठी निर्णय घेतला. संघाचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूची रूम चेक करत होते. काही खेळाडू माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या रुममध्ये यायचे. एकदा कोणीतरी माझा दरवाजा वाजवला. तेव्हा मी माझ्या पत्नीला कपाटात लपण्यास सांगितले. व्यवस्थापक माझ्या रूममध्ये आले. ते इकडे तिकडे पाहिले आणि निघून गेले. त्यानंतर अजून एक अधिकारी आला रुम पाहिली आणि गेले. माझी पत्नी त्यावेळीस कपाटातच होती. याचवेळी अझर महमूद आणि युसुफ माझ्याजवळ या नव्या नियमांशी चर्चा करण्यासाठी आले. त्यांनाही शंका आली की माझी पत्नी माझ्या खोलीतच आहे. त्यासंबंधी माझ्याशी विचारणा करू लागले. त्यानंतर मी माझ्या पत्नीला कपाटातून बाहेर येण्यास सांगितले.”
“त्यानंतर मी हे सगळे कसे बसे मॅनेज केलो. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना हरलो तेव्हा त्या दिवशी खूपच उदास वाटत होते. सारं काही एकदम डाऊन झाल्यासारखं वाटायचं. मी हॉटेलमध्ये पुन्हा गेलो आणि चेक आऊट केले आणि पत्नीला लंडन येथील अपार्टमेंटमध्ये जायला सांगितले. मी काऊंटी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मला एक अपार्टमेंट मिळाले होते,” असे सकलेन मुश्ताकने सांगितले.
सकलेन मुश्ताकने पाकिस्तानकडून 49 कसोटी आणि 169 वनडे सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे 208, 288 बळी टिपले.