---Advertisement---

अरर! हनुमा विहारी काऊंटी पदार्पणात क्षेत्ररक्षणात चमकल्यानंतर फलंदाजीत मात्र फ्लॉप; ‘इतके’ चेंडू खेळून झाला शुन्यावर बाद

On: रविवार, एप्रिल 18, 2021 12:30 AM
---Advertisement---

इंग्लंड देशात काऊंटी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. यंदा या स्पर्धेत भारताचा हनुमा विहारी हा अष्टपैलू क्रिकेटपटूही खेळत आहे. तो वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, त्याचे काऊंटी क्रिकेटमधील पदार्पण खास झाले नाही. तो शुक्रवारी (१६ एप्रिल) नॉटिंगहॅमशायरविरुद्ध खाते न उघडता बाद झाला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हनुमा विहारी फलंदाजीला आला होता आणि २२ चेंडू खेळल्यानंतर तो २३ व्या चेंडूवर बाद झाला. हनुमान विहारी २३ चेंडूंमध्ये एकही धाव न घेता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. खरंतर विहारीने या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना एक अप्रतिम झेल पकडून सर्वांची वाहवा मिळवली होती. मात्र, त्याला फलंदाजीत चमक दाखवण्यात अपयश आले आहे.

हनुमा विहारी इंग्लंडमध्ये खेळायला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएलच्या एकाही संघाने त्याला संघात घेण्यास पसंती दर्शवली नव्हती. त्यामुळे त्याने या काळात इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिले. त्याने काऊंटी क्रिकेटमधील वार्विकशायर संघाबरोबर करार केला आहे. तो वार्विकशायर संघासोबत तीन काऊंटी सामने खेळणार आहे.

या स्पर्धेमुळे त्याला इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा अधिकचा अनुभवही मिळेल. कारण भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर इंग्लंड दौरा करणार आहे. तसेच भारताला जूनमध्ये इंग्लंडमध्येच न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी

बेअरस्टोची चलाखी! टिपला ‘हा’ भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

अभिनंदन पॉली! गेल, डिव्हिलियर्सनंतर आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा परदेशी क्रिकेटर बनला पोलार्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---