---Advertisement---

मानलं भावा! इंग्लंडमध्ये राहून कोरोना रूग्णांसाठी झटतोय हनुमा विहारी, वाचा सविस्तर

On: शुक्रवार, मे 14, 2021 3:10 PM
---Advertisement---

आजकाल संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाला असून सर्व क्षेत्रातील लोक नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असलेला भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी हा देखील परदेशात राहून भारतातील नागरिकांची मदत करत आहे. याबाबतची माहिती त्याने नुकतीच एका मुलाखतीत सार्वजनिक केली.

विहारीने बनवली टीम
विहारी इंग्लंडमध्ये असला तरी, भारतात घडत असलेल्या प्रत्येक घटनेवर त्याचे लक्ष आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी विहारीने‌ इंग्लंडमधून १०० स्वयंसेवकांची एक व्हॉट्सएप टीम बनवली आहे. ही टीम तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील लोकांपर्यंत ऑक्सिजन, प्लाझ्मा, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा कोठे कोठे उपलब्ध आहेत याबाबतची माहिती देते. या टीममध्ये विहारीचे काही मित्र व सोशल मीडियावरील फॉलोवर्स आहेत.

कधी असा विचार केला नव्हता
विहारीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मला स्वतःला हिरो बनायचे नाही. लोकांना तळागाळात जाऊन मदत करण्याच्या इच्छेने मी हे काम करत आहे. गरजवंतांना मदत केली पाहिजे. त्यामुळे मी माझे मित्र व काही फॉलोवर्सना स्वयंसेवक म्हणून हे काम करण्यास प्रवृत्त केले. ही केवळ एक सुरुवात आहे. कधीही वाटले नव्हते की, दवाखान्यात बेड मिळणे इतके अवघड असेल.”

इंग्लंड दौऱ्यासाठी झाली आहे निवड
भारताच्या कसोटी संघाचा भाग असलेला हनुमा विहारी सध्या इंग्लंडमध्ये वॉर्विकशायर संघासाठी काउंटी खेळत आहे. ज्यामध्ये तो ६ सामन्यात केवळ १०० धावा काढू शकला आहे. ज्यामध्ये एका अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला असून त्याच्या येथील अनुभवाचा फायदा संघाला होईल. विहारी ३ जून रोजी भारतीय संघात सामील होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

एकेकाळी ‘या’ ५ क्रिकेटपटूंना म्हटले जायचे ‘टीम इंडियाचे भविष्य’, अजूनही आहेत पदार्पणाच्या प्रतिक्षेत!

आजच्याच दिवशी क्रिकेटचा महामेरु सचिनचे झाले होते आयपीएल पदार्पण, ‘अशी’ राहिली त्याची कारकिर्द

आयपीएलसाठी काहीही! ३ पाकिस्तानी खेळाडू, ज्यांनी आयपीएल खेळण्यासाठी स्विकारले दुसऱ्या देशाचे नागरिकत्त्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---